औरंगाबादेत अज्ञात वाहनांच्या धडकेत अभियांत्रिकीची विद्यार्थिनी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 15:36 IST2018-10-24T15:35:48+5:302018-10-24T15:36:03+5:30

महाविद्यालयात जाणाऱी मोपेडस्वार अभियांत्रिकी विद्यार्थी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागेवरच ठार झाली.

Engineering student killed in unknown vehicle accident in Aurangabad | औरंगाबादेत अज्ञात वाहनांच्या धडकेत अभियांत्रिकीची विद्यार्थिनी ठार

औरंगाबादेत अज्ञात वाहनांच्या धडकेत अभियांत्रिकीची विद्यार्थिनी ठार

औरंगाबाद: महाविद्यालयात जाणाऱी मोपेडस्वार अभियांत्रिकी विद्यार्थी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागेवरच ठार झाली. ही घटना आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास उस्मानपुरा भागातील भाजीवाली बाई पुतळ्या जवळ घडली. सीसीटीव्ही च्या मदतीने पोलीस त्या अज्ञात वाहनाचा शोध घेत आहे.

वैभवी सुनील खिरड(  वय 17 ,चाणक्यपुरी, शाहनूर मियाँ चौक,उस्मानपुरा) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थिनींचे नाव आहे. या अपघाता बाबत मृत वैभवीच्या नातेवाईकांनी दिलेली अधिक माहिती अशी की, वैभवी ही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात तंत्रनिकेतन शाखेत प्रथम वर्षात होती.

आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास मोपेडने (एम एच 20 बी.आर.191) शिकवणीसाठी  जात असताना उस्मानपुरा येथील भाजीवाली बाई चौकात अज्ञात वाहनाने तिच्या वाहनाला जोराची धडक दिली.डोक्याला गंभीर मार लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला.सकाळी या रस्त्यावर वर्दळ नसते व परिसरातील दुकाने देखील उघडली नसल्याने नेमका अपघात कसा झाला हे कोणीही पाहिले नाही. या बाबत माहिती मिळताच  पोलिसांनी  वैभविला घाटी रुग्णालायत दाखल केले . तथील डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे.पोलीस परिसरातील cctv फुटेज च्या आधारे अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत . 

परिवारातील एकुलती एक मुलगी 
खिराड  परिवारात तीन बंधू आहेत. सुनील यांना वगळता इतर दोन्ही  बंधू ना मुले आहेत परिवारात वैभवी एकटीच मुलगी होती

Web Title: Engineering student killed in unknown vehicle accident in Aurangabad