इंजिनिअरचा डेंग्यूने घेतला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:49 IST2017-09-29T00:49:20+5:302017-09-29T00:49:20+5:30
सातारा परिसरात डेंग्यूने सिव्हिल इंजिनिअर अनंता भागवत आडसूळ (२५) यांचा गुरुवारी बळी घेतला.

इंजिनिअरचा डेंग्यूने घेतला बळी
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सातारा परिसरात डेंग्यूने सिव्हिल इंजिनिअर अनंता भागवत आडसूळ (२५) यांचा गुरुवारी बळी घेतला. फार्मसीची विद्यार्थिनीदेखील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल आहे.
अनंताला आठवड्यापासून थोडा ताप होता.कामाच्या व्यापात त्याने फारसी काळजी घेतली नाही; परंतु बुधवारी त्याची प्रकृती जास्त बिघडल्याने घरच्यांनी त्याला खासगी दवाखान्यात नेले. तेथून त्यांना घाटीत पाठविण्यात आले. घाटीतील उपचारास म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही अन् आडसूळची प्राणज्योत मावळली.