शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

भूखंडावर अतिक्रमण; वकिलास शिक्षा

By admin | Updated: October 1, 2014 00:55 IST

बीड : भूखंडावर अतिक्रमण करणे केज येथील एका वकिलाला चांगलेच महागात पडले. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या भूखंडावर अतिक्रमण केल्यावरुन शनिवारी वकिलाला न्यायालयाने

बीड : भूखंडावर अतिक्रमण करणे केज येथील एका वकिलाला चांगलेच महागात पडले. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या भूखंडावर अतिक्रमण केल्यावरुन शनिवारी वकिलाला न्यायालयाने महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावत चांगलाच दणका दिला. कायद्यापुढे सारे समान असतात याचा प्रत्यय यानिमित्ताने आला़झाले असे, केज येथील जिल्हा परिषद हायस्कूलसमोर महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एन. ए. इनामदार यांचा ४० बाय ६५ इतका प्लॉट आहे. त्यांनी येथे घर बांधले़ केज येथीलच अ‍ॅड. उस्मान सरवर पटेल यांनी इनामदार यांच्या प्लॉटला चिकटून ५० बाय ५० चा प्लॉट असल्याचा दावा केला. पटेल यांच्या रजिस्ट्रीच्या कागदपत्रांवर केवळ तीन सीमांचा उल्लेख आहे़ त्यांनी प्लॉटवर बांधकाम करताना इनामदार यांच्या रिकाम्या जागेवरही अतिक्रमण केले. इनामदार यांनी पटेल यांच्या बांधकामावर आक्षेप नोंदवत अंबाजोगाई येथील न्यायालयात धाव घेतली़ ३१ जुलै २०१२ मध्ये न्यायालयाने ‘जैसे थे’चे आदेश दिले. मात्र, या आदेशानंतरही अ‍ॅड. पटेल यांनी बांधकाम सुरुच ठेवले. इनामदार यांनी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली़ त्यानंतर न्यायालयाने नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला. शिवाय वादी, प्रतिवादीकंडून सबळ पुरावे मागवून घेतले. इनामदार यांनी आपल्या भूखंडाचे दस्ताऐवज व अ‍ॅड. पटेल यांनी केलेल्या अतिक्रमणाची छायाचित्रे न्यायालयापुढे ठेवली. न्या. पी. एम. मोरे यांनी परिस्थितीजन्य पुरावे तपासून अ‍ॅड. उस्मान पटेल यांना एक महिन्याच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली. या निर्णयाने कायद्यावरील विश्वास वाढल्याचे इनामदार यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)