शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

अपक्षांचीही ताकद पणाला...

By admin | Updated: October 3, 2014 00:31 IST

गजेंद्र देशमुख , जालना या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीतही मोठ्या प्रमाणावर अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहेत. परंतु, हे अपक्ष उमेदवार मतदारांवर मोठा प्रभाव टाकतील, असे चिन्हे नसली तरी,

गजेंद्र देशमुख , जालनाया जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीतही मोठ्या प्रमाणावर अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहेत. परंतु, हे अपक्ष उमेदवार मतदारांवर मोठा प्रभाव टाकतील, असे चिन्हे नसली तरी, या उमेदवारांनीही आपली ताकद पणाला लावली आहे.सर्वसाधारणपणे निवडणुकीत अपक्ष फार मोठी भूमिका पार पाडतात. परंतु या जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहता अपक्ष उमेदवारांनी म्हणावी तेवढी कामगिरी केलेली दिसत नाही.लोकसभा निवडणुकीतसुध्दा १९५१ पासूनच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत फक्त ५० अपक्ष उमेदवारांनी विविध वेळी निवडणुक लढविली. काही अपवाद वगळता सर्वच निवडणुकांमध्ये अपक्षांच्या पारड्यात १० हजार मतांपेक्षा अधिक मते पडलीच नाहीत. किंबहूना टक्केवारी पाहता ५ टक्क्यांपेक्षा अधिक मतेही अपक्षांनी मिळविली नाहीत. निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवार मतांची विभागणी करण्यात मोठी भूमिका पार पाडतात. परंतु जालना जिल्ह्यात लोकसभेसह विधानसभेतसुध्दा अपक्षांचा दबाव काही जाणवलाच नाही. निवडणूक लढतांना ‘साम-दाम-दंड-भेद’ या नीतींचा वापर केला जातो. ओघानेच विरोधकांना धूळ चारण्यासाठी त्याच्या समाजाचा, त्याच्याच क्षेत्रातला ‘डमी’ उमेदवार उभा करून प्रतिस्पर्ध्याच्या मतांची विभागणी करण्याची कूटनिती आखण्यात येते. याव्यतिरिक्त काही इच्छूक उमेदवार आपले नशीब आजमावण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरतात. त्यामुळेच अपक्ष उमेदवारांना मोठे महत्व प्राप्त होते.परंतू या निवडणुकीत तसे चित्रही जाणवत नाही. कारण महायुती व आघाडी दोन्हीही संपुष्टात आल्याच्या पार्श्वभूमीवरच मुळात सर्व मतदारसंघात उमेदवारांची भाऊगर्दी झाली आहे. त्यातील निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या विविध पक्षांच्या इच्छूकांनी अंतिमक्षणी पक्षीय बंधने, वैचारिक बंधने वगैरे गुंडाळून अन्य पक्षात प्रवेश केला. उमेदवारी पटकावली व प्रचारयुध्दातही ते जुंपले. त्यामुळेच या पाचही मतदारसंघात अन्य कोणत्याही इच्छुकांनी बंडखोरीची भूमिका बजावली नाही. त्यास केवळ भोकरदन अपवाद. या मतदाररसंघात कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते एल. के. दळवी यांनी बंडखोरी केली. त्यापाठोपाठ कॉँग्रेसचे विद्यमान नगरसेवक पठाण यांनीही बंडाचे निशाण फडकावले. हे दोघेही अन्य पक्षात न जाता स्वबळावर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे हे दोघे कितपत शक्ती दाखवणार याविषयी उत्सूकता निर्माण झाली आहे. एकूण या जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या विविध निवडणुकांध्ये शेकडो अपक्ष उमेदवार होते. काही अपवाद वगळता त्यांना ५ हजारपेक्षा अधिक मते मिळाली नाहीत. अपक्ष उमेदवारांची संख्या वाढत असली तरीही ते मतदारांवर प्रभाव पाडू शकले नाहीत. मात्र, मतविभागणीत त्यांनी मोठा हातभार लावला.