शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

अ...‘अकरावी’चा!

By admin | Updated: June 25, 2014 00:38 IST

श्रीनिवास भोसले, नांदेड दहावी-बारावीच्या निकालानंतर आता प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. निकाल लागेपर्यंत निकाल काय लागतो, याची धाकधुक विद्यार्थ्यांना होती़

श्रीनिवास भोसले, नांदेडदहावी-बारावीच्या निकालानंतर आता प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. निकाल लागेपर्यंत निकाल काय लागतो, याची धाकधुक विद्यार्थ्यांना होती़ निकालानंतर आता अ‍ॅडमिशन कोणत्या महाविद्यालयात होणार, पाहिजे तो ग्रुप मिळेल की नाही या प्रश्नांचे ओझे विद्यार्थ्यांच्या डोक्यावर आहे़ नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थी नांदेडातील यशवंत महाविद्यालय, सायन्स कॉलेज, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, प्रतिभा निकेतन, पीपल्स महाविद्यालयासह व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थामध्ये प्रवेशपूर्व नोंदणीसाठी विद्यार्थी-पालक गर्दी करीत आहेत़ बारावी परीक्षेत नांदेडचा निकाल गत चार वर्षापासून उच्चांक गाठत असल्याने शिक्षणासाठी नांदेडात येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे़ शालांत परीक्षेत नांदेड जिल्ह्याचा निकाल ७४़२९ टक्के लागला़ गत वर्षीच्या तुलनेत निकालाची टक्केवारी १८़८९ टक्क्यांनी वाढली आहे़ बारावीमध्ये जिल्ह्याचा निकाल ९० टक्के लागला तर १७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे़बारावी परीक्षेतील नांदेड जिल्ह्याला मिळालेले यश आणि शहरातील यशवंत महाविद्यालय, सायन्स कॉलेजामध्ये विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या जाणारी मेहनत यामुळे बारावी शिक्षणासाठी नांदेडला पालक प्राधान्य देत आहेत़ त्यातच मेडिकलबरोबर इंजिनिअरिंगसाठी सर्वाधिक विद्यार्थी देणारे शहर म्हणून नांदेडची ओळख निर्माण होत आहे़ नांदेड शहरातील प्रमुख महाविद्यालयात प्रवेशपूर्व नोंदणी तर काही कॉलेजमध्ये प्रत्यक्ष प्रवेश सुरू झाले आहेत़ यशवंत अथवा सायन्स महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची लगबग सुरू आहे़ यशवंतमध्ये आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया तर सायन्स, एनएसबी, प्रतिभा निकेतनमध्ये प्रत्यक्ष नोंदणी प्रक्रिया सुरू आहे़ यशवंत महाविद्यालयात आजपर्यंत ७ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे़ जिनियस बॅचमुळे यशवंतमध्ये सर्वाधिक विद्यार्थी प्रवेश घेवू इच्छितात़ सायन्समध्ये ३१०० तर एनएसबीमध्ये ५०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यशवंतमध्ये ८५ टक्के तर सायन्स कॉलेजमध्ये ८० टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता आहे़ अकरावीचे अ‍ॅडमिशन नाममात्रबहुतांश विद्यार्थी महाविद्यालयात नाममात्र प्रवेश घेवून खासगी शिकवणीवर भर देत आहेत़ नांदेडमध्ये अकरावी, बारावीचे शिक्षण घ्यायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे़ शहरासह ग्रामीण भागातील काही कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर थेट परीक्षेलाच जायची मुभा दिली जाते़ यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचतो, अशी विद्यार्थी आणि पालकांची धारणा आहे़ प्रत्यक्ष शिक्षण खासगी शिकवणीत कॉलेजमध्ये शिक्षणाचा दर्जा नाही अशी ओरड करीत हजारो रूपये भरून खासगी शिकवणीकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे़ नांदेडमध्ये अकरावी आणि बारावीच्या शिकवणी घेणारे शेकडो क्लासेस आहेत़ खासगी क्लासेसच्या गुणवत्तेची खात्री करण्याची गरजखासगी क्लासेसच्या संख्येत प्रचंड मोठी वाढ झाली आहे़ काही क्लासेस संचालक विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी खोटा निकाल प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांची फसवणूक करीत असल्याची बाब गतवर्षी उघडकीस आली होती़ यामुळे पालकांनी प्रवेश घेण्यापुर्वी तेथील गुणवत्ता आणि जाहीरातीमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या निकालाची खात्री करून घेणे गरजेचे आहे़यशवंतमध्ये गुणवत्तेनुसारच प्रवेशअकरावी प्रवेशासाठी यशवंत महाविद्यालयाकडून आॅनलाईन नाव नोंदणी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर १९ जूनपासून सुरू झाली आहे़ आजपर्यंत ७ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली़ २८ जूनपर्यंत नोंदणी करता येईल़ यानंतर सर्वसमावेश गुणवत्ता यादी ३० जून रोजी प्रसिद्ध होईल, यावरील आक्षेप त्याच दिवशी़ १ जुलै रोजी गुणवत्ता यादी तद्नंतर २ जुलैपासून प्रत्यक्ष प्रवेशास सुरूवात होईल़ गुणवत्ता आणि आरक्षणाच्या निकषावर प्रवेश होतील़ प्राचार्य डॉ़ एऩ व्ही़ कल्याणकर, यशवंत महाविद्यालयअकरावीला भूकंपशास्त्र विषयसायन्स कॉलेजमध्ये आजपर्यंत ३१०० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष नाव नोंदणी केली आहे़ पालकांची होणारी धावपळ आणि अडचण लक्षात घेवून प्रत्यक्ष नोंदणी प्रक्रिया ठेवण्यात आली़ सायन्समध्ये जनरल विषयासह इतर विषयाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ यामध्ये प्रामुख्याने भुकंपशास्त्र आणि आयटीचा समावेश आहे़ सर्वसाधारण यादी १ जुलैला प्रसिद्ध होईल़ यानंतर प्रत्यक्ष प्रवेशास सुरूवात होणार आहे़ प्राचार्य डॉ़ जी़एमक़ळमसे, सायन्स कॉलेज