शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अकरा वर्षीय भावाने घोटला ४ वर्षीय चिमुकलीचा गळा!

By admin | Updated: August 11, 2015 00:59 IST

बिडकीन : जे वय खेळण्या- बागडण्याचे, मौजमस्ती करण्याचे असते, त्या ११ वर्षीय निरागस वयाच्या मुलाने चक्क सूड भावनेतून आपल्या

बिडकीन : जे वय खेळण्या- बागडण्याचे, मौजमस्ती करण्याचे असते, त्या ११ वर्षीय निरागस वयाच्या मुलाने चक्क सूड भावनेतून आपल्या चारवर्षीय चुलत बहिणीचा गळा घोटून खून केला. ही धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी बिडकीन परिसरातील जैतापूर- पैठणखेडा शिवारात घडली. चुलत्याने दोन वर्षांपूर्वी केलेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठीच चुलत बहिणीचा या बालकाने खून केल्याचे तपासात समोर आले आहे. बिडकीन पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले.शामल कालीस काळे (४) असे खून झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, शामल ही आपल्या आई-वडिलांसोबत जैतापूर शिवारात वस्ती करून राहत होती. बाजूलाच तिचे अन्य दोन चुलते कुटुंबासह राहतात. तिचे वडील आणि आई हे दोघे रविवारी हर्सूल जेलमध्ये अटकेत असलेल्या आपल्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी गेलेले होते. त्यामुळे शामल घरी एकटीच होती. सायंकाळी साडेसहाला शामलची आई घरी आली. तेव्हा घरासमोरच्या पलंगावर शामल ही निपचित पडलेली तिला दिसली. आईने तिला उठविण्याचा प्रयत्न केला. ती उठेना. जवळ जाऊन आईने तिला हलविले, तेव्हा तिचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. आईने लगेच हंबरडा फोडला. तिचा गळा दाबून खून करण्यात आला असल्याचे दिसून आले. ही माहिती पोलीस पाटलाने बिडकीन ठाण्यात कळविली. माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी चंद्रकांत अलसटवार, निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, फौजदार गोरख खंडाळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री पोलिसांनी पाहणी केली तेव्हा शामलचा गळा दाबून खून करण्यात आलेला असल्याचे आढळून आले. पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर त्यावेळी वस्तीवर शामल आणि तिचा अकरा वर्षीय चुलत भाऊच असल्याचे समोर आले. पोलिसांना पाहताच हा चुलत भाऊ गांगरून गेलेला होता. तो घाबरलेला दिसत होता. त्यामुळे पोलिसांना संशय येत होता. अखेर पोलिसांना चिमुकल्या चुलत भावावर आलेला संशय खरा ठरला. सूडाने पेटला होता चिमुरडा...दोन वर्षांपूर्वी किरकोळ कारणावरून मयत शामलच्या वडिलांनी तिच्या अकरा वर्षीय चुलत भावाला बेदम मारहाण केली होती. ही मारहाण त्या चिमुरड्याच्या मस्तकात बसली होती.