विभागीय क्रीडा संकुलाच्या २१.५९ कोटींचे अकरा घोटाळेबाज हर्सूल कारागृहात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 14:29 IST2025-01-15T14:27:17+5:302025-01-15T14:29:20+5:30

गुन्ह्यात आयटी ॲक्टची वाढ; तपास पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्याकडे वर्ग

Eleven scammers of 21.59 crores from the Divisional Sports Complex are in Hersul jail | विभागीय क्रीडा संकुलाच्या २१.५९ कोटींचे अकरा घोटाळेबाज हर्सूल कारागृहात

विभागीय क्रीडा संकुलाच्या २१.५९ कोटींचे अकरा घोटाळेबाज हर्सूल कारागृहात

छत्रपती संभाजीनगर : विभागीय क्रीडा संकुलाच्या २१.५९ घोटाळ्यातील पोलिस कोठडीत असलेल्या हर्षकुमार क्षीरसागरसह ११ आरोपींची हर्सूल कारागृहात रवानगी झाली आहे.

२१ डिसेंबर रोजी संकुलातील घोटाळ्याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. कंत्राटी लिपीक हर्षकुमारने कुटुंबातील सदस्य, मैत्रीण, सहकाऱ्यांच्या मदतीने हा घोटाळा केला. आर्थिक गुन्हे शाखेने यात आतापर्यंत ११ आरोपींना अटक केली. त्यात हर्षकुमारची तब्बल १४ दिवसांच्या पोलिस कोठडीत कसून चौकशी झाली. मंगळवारी या कोठडीची मुदत संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. त्यामुळे यात आता अन्य आरोपी वाढण्याची शक्यतादेखील धूसर झाली आहे, तर हर्षकुमारचा एक मित्र अद्यापही पसार आहे.

अटकेतील आरोपी
१. हर्षकुमार क्षीरसागर
२. अनिल क्षीरसागर (वडील)
३. मनीषा क्षीरसागर (आई)
४. हितेश आनंदा शार्दूल (मामा)
५. यशोदा शेट्टी (संकुलात कंत्राटी लिपीक)
६. जीवन कार्यप्पा विंदडा (संकुलात मेसचालक, यशोदाचा पती)
७. नागेश श्रीपाद डोंगरे (कर्मचारी पुरवणाऱ्या वेव मल्टिसर्व्हिसेसचा व्यवस्थापक)
८. अर्पिता वाडकर (हर्षकुमारची मैत्रीण)
९. स्वप्नील तांगडे (शासकीय लिपिक),
१०. सचिन वाघमारे (सहव्यवस्थापक, इंडियन बँक)
११. नितीन लाखोले (लिपिक, इंडियन बँक)

कलमात वाढ
सोमवारी सदर गुन्ह्यात मोबाइल, टॅबसह ई-मेलआयडी बदलल्याची मुख्य भूमिका राहिल्याने आयटी ॲक्टची वाढ करण्यात आली. त्यामुळे निरीक्षक संभाजी पवार यांच्याकडे तपास वर्ग झाला.

आत्तापर्यंत आढळलेली संपत्ती
- ४ कार, १ दुचाकी
- ५ फ्लॅट, २ गाळे, १ रो-हाउस
- ५ मोबाइल, २ टॅब
- १० हिरेजडित गॉगल
- जवळपास अर्धा कि. सोने.

Web Title: Eleven scammers of 21.59 crores from the Divisional Sports Complex are in Hersul jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.