अट्टल गुन्हेगारांच्या घराची वीज खंडित; अन्य करही तपासणार; पोलिस आयुक्तांचा ‘शॉक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 15:25 IST2025-03-10T15:22:52+5:302025-03-10T15:25:02+5:30

विविध भागांत राहणाऱ्या सर्व गुन्हेगारांचे वीजबिल, मालमत्ता कर, पाणीपट्टी तपासली जाईल.

Electricity cut off at the house of a hardened criminal; Will also check other taxes; Police Commissioner 'shocked' | अट्टल गुन्हेगारांच्या घराची वीज खंडित; अन्य करही तपासणार; पोलिस आयुक्तांचा ‘शॉक’

अट्टल गुन्हेगारांच्या घराची वीज खंडित; अन्य करही तपासणार; पोलिस आयुक्तांचा ‘शॉक’

छत्रपती संभाजीनगर : वारंवार कारवाई करून, कारागृहात जाऊनही अमली पदार्थांच्या तस्करांवर परिणाम होत नव्हता. अशा गुन्हेगारांच्या घराचे थकित वीजबिल, कनेक्शन अनधिकृत असल्यास थेट वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई पोलिसांनी महावितरणच्या मदतीने सुरू केली आहे. शनिवारी पहिल्या टप्प्यात नारेगावच्या बलूच गल्लीत सात गुन्हेगारांच्या घराचा अनधिकृत वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

शहरातील नशेखाेरी थांबवण्यासाठी पोलिस आयुक्त शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सहा महिन्यांत अमली पदार्थांचे सेवन व विक्री करणाऱ्यांवर १७६ गुन्हे दाखल करण्यात आले. यात नारेगावमधील कुख्यात बलूच गल्लीत पहिल्यांदाच पोलिसांनी धडक मोहीम राबविली. तेव्हा अनेक कुख्यात अमली पदार्थांच्या तस्करांनी अनधिकृत वीजजोडणी घेतल्याचे निष्पन्न झाले होते. परंतु दहशतीमुळे महावितरणचे कर्मचारी तेथे जाण्याची हिंमत करत नव्हते. ही बाब आयुक्त पवार यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी महावितरणला पत्रव्यवहार करून पोलिस संरक्षणात कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली.

एमआयडीसी पोलिसांच्या सुरक्षेत शनिवारी दुपारी ग्यानसिंग उर्फ बच्चन विष्णू मलके, चरणसिंग करमसिंग मलके, दीपक करम सिंग मलके, संदीप दीपक मलके, मालन दीपक मलके, राधा विशाल माचेकर, मुन्नी शेरसिंग इंद्रेकर यांनी घेतलेला अनधिकृत वीजजोडणी तोडण्यात आली. शिवाय, त्यांच्यावर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आली.

मनपाकडून कर, पाणीपट्टीही तपासणार
विविध भागांत राहणाऱ्या सर्व गुन्हेगारांचे वीजबिल, मालमत्ता कर, पाणीपट्टी तपासली जाईल. ती प्रलंबित असेल, अनधिकृत असल्यास पोलिस संरक्षणात थेट हातोडा मारण्याची तयारी पोलिस आयुक्त पवार यांनी केली आहे.

Web Title: Electricity cut off at the house of a hardened criminal; Will also check other taxes; Police Commissioner 'shocked'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.