शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
4
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
5
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
6
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
7
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
8
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
9
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
10
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
11
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
12
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
13
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
14
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
15
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
16
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
17
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
18
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
19
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
20
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
Daily Top 2Weekly Top 5

अजिंठ्यासह २४ गावांत ३२ तासांपासून वीज गुल

By admin | Updated: July 24, 2014 00:39 IST

अजिंठा : अजिंठा परिसरात दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत असून यामुळे सूर्यदर्शन झाले नाही. २४ गावात ३२ तासांपासून वीजही नाही.

अजिंठा : अजिंठा परिसरात दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत असून यामुळे सूर्यदर्शन झाले नाही. २४ गावात ३२ तासांपासून वीजही नाही.या पावसामुळे जमिनीचे पोट भरले असले तरी नदी-नाले अजून कोरडेच आहेत. मंगळवारी दुपारपासून पावसाला सुरुवात झाली. रात्री ११ वाजता वारा व पावसामुळे वीज गुल झाली. बुधवारी दिवसभर वीज कर्मचारी बिघाड बघत फिरत होते. दुपारी त्यांना बिघाड कळला; मात्र पाऊस सुरू असल्याने कर्मचाऱ्यांना खांबावर चढता आले नाही. यामुळे मंगळवारी रात्रभर व बुधवारी रात्रभर वीज गुल होती. अजिंठा शिवनासह २४ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. अजिंठा घाटात तारा तुटल्या. पाऊस उघडताच युद्धपातळीवर काम करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती कनिष्ठ अभियंता राजपूत यांनी दिली. (वार्ताहर)पावसामुळे माळवदाची घरे गळू लागलीवडोदबाजार : रिपरिप पावसामुळे गावातील माळवदाची घरे गळू लागल्याने ग्रामस्थांची एकच धांदल उडाली. दोन दिवसांपासून सतत भीजपाऊस पडत असल्याने माळवदाच्या घरांना पाण्याचा टपका लागला आहे. त्यामुळे अनेक जण हैराण झाले आहेत. घरांना पाण्याचा लागलेला टपका रोखण्यासाठी घरांच्या छतावर मेनकापड अंथरले जात आहे. गावातील दुकानात मेनकापडाची विक्री वाढली आहे. अडगळीला पडलेल्या छत्र्या, रेनकोट व गरम कपडेही पावसामुळे नागरिकांनी बाहेर काढली आहेत.