घाटी रुग्णालयात इलेक्ट्रिक बेडला आग, सुदैवाने दुर्घटना टळली

By संतोष हिरेमठ | Updated: August 30, 2023 09:54 IST2023-08-30T09:53:59+5:302023-08-30T09:54:48+5:30

कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.

Electric bed fire at Ghati Hospital, luckily mishap averted | घाटी रुग्णालयात इलेक्ट्रिक बेडला आग, सुदैवाने दुर्घटना टळली

घाटी रुग्णालयात इलेक्ट्रिक बेडला आग, सुदैवाने दुर्घटना टळली

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात आयसीसीयूमधील एका बेडला आग लागण्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. सुदैवाने बेडवर कोणताही रुग्ण नव्हता. त्यामुळे दुर्घटना टळली.

याविषयी मिळालेली माहिती अशी, आयसीसीयूमध्ये असलेल्या एका इलेक्ट्रिक बेडला रात्री दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. ही बाब लक्षात येताच डॉक्टर आणि उपस्थित कर्मचाऱ्यांनी हा बेड बाहेर नेत आग आटोक्यात आणली. 

बेडवर रुग्ण असता तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. परंतु उपस्थित कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.

Web Title: Electric bed fire at Ghati Hospital, luckily mishap averted