वारे निवडणुकीचे! पालिका हद्दीतील प्रभाग रचना २९ ऑगस्टपर्यंत अंतिम होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 19:54 IST2025-06-13T19:53:59+5:302025-06-13T19:54:15+5:30

महापालिका निवडणुकीसाठी अ, ब आणि क वर्गांच्या महापालिकेत चार वॉर्डांचा एक प्रभाग यानुसार रचना

Elections in the air! Ward composition within the municipal limits will be finalized by August 29th | वारे निवडणुकीचे! पालिका हद्दीतील प्रभाग रचना २९ ऑगस्टपर्यंत अंतिम होणार

वारे निवडणुकीचे! पालिका हद्दीतील प्रभाग रचना २९ ऑगस्टपर्यंत अंतिम होणार

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्तांना राज्यशासनाच्या नगर विकास विभागाने प्रभाग रचना तयार करण्याचे वेळापत्रक पाठविले असून, त्यानुसार प्रभाग रचनेच्या कामाला बुधवारपासूनच (दि. ११ जून) सुरुवात करण्याचे आदेशित केले आहे.

महापालिका निवडणुकीसाठी अ, ब आणि क वर्गांच्या महापालिकेत चार वॉर्डांचा एक प्रभाग यानुसार रचना करून निवडणूक घेण्याचे आदेश दोन दिवसांपूर्वी नगर विकास विभागाने काढले होते. त्यानंतर बुधवारी, ११ जून रोजी नगर विकास विभागाने प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर केले.

असे आहे प्रभाग रचनेचे टाईम टेबल...
-दि. ११ ते १६ जूनदरम्यान प्रगणक गटाची मांडणी

याच दरम्यान प्रारूप प्रभाग रचना तयार होईल.
-दि. १७ आणि १८ जून रोजी जनगणनेची प्राप्त माहिती तपासण्यात येईल.

-दि. १९ ते २३ जूनदरम्यान स्थळ पाहणी केली जाईल.

-दि. २४ ते ३० जूनदरम्यान गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करण्यात येतील.
-दि. १ ते ३ जुलैदरम्यान नकाशावर निश्चित केलेल्या प्रभाग हद्द जागेवर जाऊन तपासण्यात येतील.

-दि. ४ ते ७ जुलैदरम्यान प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर प्रभाग रचना समितीच्या स्वाक्षऱ्या केल्या जातील.
-दि. ८ ते १० जुलै प्रभाग रचनेचा प्रस्ताव आयोगाकडे जाईल.

-दि. २२ ते ३१ जुलैदरम्यान प्रभाग रचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती, सूचना मागविण्यात येतील.
-दि. १ ते ११ ऑगस्टदरम्यान हरकतींवर सुनावणी होईल.

-दि. १२ ते १८ ऑगस्टदरम्यान सुनावणीनंतरची प्रभाग रचना आयोगाकडे जाईल.
-दि. २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध होईल.

Web Title: Elections in the air! Ward composition within the municipal limits will be finalized by August 29th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.