शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईने मनपाला केले अंतर्मुख!

By admin | Updated: February 18, 2016 00:06 IST

औरंगाबाद : ‘पाणी वाचवा’ या विषयावर औरंगाबाद महापालिकेतर्फे राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

औरंगाबाद : ‘पाणी वाचवा’ या विषयावर औरंगाबाद महापालिकेतर्फे राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भविष्यात शिधापित्रिकेशिवाय हंडाभर पाणी मिळणार नाही, या सर्वोत्कृष्ट पोस्टरला पहिले बक्षीस देण्यात आले. चाळीसगावच्या राजश्री देशमुख या विद्यार्थिनीने अनोखे आणि महापालिकेला अंतर्मुख करणारे पोस्टर तयार केले होते.मनपाच्या पोस्टर स्पर्धेला राज्यभरातील कलावंतांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेचे बक्षीस वितरण मंगळवारी महापालिकेच्या टाऊन हॉल येथील सभागृहात पार पडले. यावेळी महापौर त्र्यंबक तुपे, एमआयएम गटनेता नासेर सिद्दीकी, नगरसेवक गंगाधर ढगे, बन्सी जाधव, नगरसेविका शुभा बुरांडे, सुनीला अऊलवार, अर्चना नीळकंठ, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपायुक्त रवींद्र निकम यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या देशमुखला दहा हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. अमरावतीच्या रेणुका भेरडे हिने द्वितीय बक्षीस पटकावले. तिला साडेसात हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. श्रीरामपूरच्या सिद्धार्थ डोईफोडेला तृतीय क्रमांकावर समाधान मानवे लागले. त्याला पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. याशिवाय उत्तेजनार्थ अश्विनी सालोडकर, अनंत नवपुते, राजेश मुंधरे, मनोज पाठक, सौरभ टिपरे यांची निवड करण्यात आली.परीक्षक म्हणून मनपाचे उपायुक्त निकम, प्रा. बाविस्कर, प्रा. शिरीष आंबेकर, विजया पातूरकर, उदय भोईर, मधुकर गंगावणे आदींनी काम पाहिले. नागरिकांना पाहण्यासाठी टाऊन हॉल येथे हे प्रदर्शन २१ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.