भाजपा-शिंदेसेनेतील कलहामुळे एकनाथ शिंदेंची वैजापूरची सभा रद्द: चंद्रकांत खैरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 19:48 IST2025-11-25T19:46:35+5:302025-11-25T19:48:16+5:30
एकनाथ शिंदेचे ३५ आमदार फुटीच्या मार्गावर- चंद्रकांत खैरे

भाजपा-शिंदेसेनेतील कलहामुळे एकनाथ शिंदेंची वैजापूरची सभा रद्द: चंद्रकांत खैरे
वैजापूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ३५ आमदार फुटण्याची शक्यता असून ते भाजपच्या मार्गावर असल्याचा दावा उद्धवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सोमवारी वैजापूर येथे केला.
वैजापूर नगरपालिका निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ खैरे यांनी शहरात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले भाजप, शिंदेसेनेत सध्या अंतर्गत धुसफूस सुरू आहे. वैजापूर नगरपालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष समोरासमोर उभे राहिले आहेत. भाजपा-शिंदेसेनेतील वाढत्या कलहामुळे एकनाथ शिंदे यांची वैजापूरची सभा रद्द करावी लागली. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष सोडून गद्दारी केलेले कधीही यशस्वी होऊ शकणार नाहीत, असे ते म्हणाले. शिंदेचे ३५ आमदार फुटीच्या मार्गावर असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुभाष गायकवाड, सुदाम सोनवणे, पद्माकर इंगळे, अविनाश कुमावत, सुनीता आऊलवार, सुनीता देव, अनिता मंत्री, काँग्रेस तालुकाध्यक्ष राहुल संत, शहराध्यक्ष डॉ. नितेश शहा, सुनील बोडखे, सतीश धुळे आदी उपस्थित होते.