वेरूळ येथे कार - रिक्षाच्या धडकेत आठ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 13:30 IST2019-03-29T13:30:28+5:302019-03-29T13:30:58+5:30
जखमींवर खुलताबाद येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

वेरूळ येथे कार - रिक्षाच्या धडकेत आठ जण जखमी
खुलताबाद (औरंगाबाद ) : सोलापुर-धुळे महामार्गावरील वेरूळ तांडयाजवळ आज सकाळी 10 वाजता कार आणि रिक्षाच्या अपघातात आठजण जखमी झाले. जखमींवर खुलताबाद येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
खुलताबाद तालुक्यातील शुलिभंजन येथील शेख कुटुंब धार्मिक कार्यक्रमासाठी शेकमारू (ता कन्नड़) येथे रिक्षामध्ये जात होते. हे भाविक वेरूळच्या पुढे असणाऱ्या तांडयाजवळ आले असता विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. धडक जोरदार असल्याने रिक्षा महामार्गाच्या खाली उलटला. यानंतर परिसरातील नागरिकांनी जखमींना रिक्षातून बाहेर काढले. १०८ रुग्णवाहिकेला नागरिकांनी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे खाजगी वाहनातून जखमींना उपचारासाठी खुलताबाद येथे दाखल करण्यात आले.
जखमींची नावे :
रिहाना शेख सलीम (35), शेख सलीम शेख चॉंद (45) , रिजवाना सलीम पठाण (20), शेख मुश्ताक (25) शेख मुस्कान शेख कलीम (7), रूख्साना बाबा पठाण (35), शेख शमीम बक्षू मुश्ताक बक्षू (सर्व रा.शुलीभंजन ता.खुलताबाद )