शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

‘तेरणा’ची आठ महिन्यांत होणार चौैकशी

By admin | Updated: March 5, 2015 00:02 IST

उस्मानाबाद : ‘तेरणा’तील व्यवहाराबाबत कारखान्याच्या अधिकाऱ्यांसह साखर आयुक्त, प्रादेशिक सहसंचालक, विशेष लेखापरिक्षक यांची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याचे आदेश

उस्मानाबाद : ‘तेरणा’तील व्यवहाराबाबत कारखान्याच्या अधिकाऱ्यांसह साखर आयुक्त, प्रादेशिक सहसंचालक, विशेष लेखापरिक्षक यांची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याचे आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाने ३ डिसेंबर रोजी दिले होते. या अनुषंगाने राज्याच्या सहकार विभागाने या चौकशीसाठी सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश एस. पी. मुळे यांची नियुक्ती केली असून, सदर चौकशी आठ महिन्यांत पूर्ण करून याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर करण्यास सांगितले आहे. ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या लेखापरिक्षण अहवालानुसार राज्य शासन, साखर आयुक्त, साखर सहसंचालक, विशेष लेखापरिक्षक - वर्ग एक (साखर) हे कारवाई करीत नसल्याने कारखान्याचे सभासद विजेंद्र चव्हाण, गफार काझी, रामहरी शिंदे यांनी अ‍ॅड़ ए़एऩईरपतगिरे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती़ यात साखर आयुक्त (पुणे), प्रादेशिक सहसंचालक (नांदेड), विशेष लेखापरिक्षक वर्ग -एक (सहकारी संस्था) आणि तेरणा सहकारी साखर कारखान्याचे अधिकारी यांच्या कारभाराची जिल्हा न्यायाधीशांमार्फत चौकशी करून दंडात्मक कारवाई करावी तसेच व्यवहारातील रक्कम वसुलीची दिवाणी कारवाई करण्याची विनंती केली होती़ ही याचिका उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती पी़ बी़ धर्माधिकारी, न्यायमूर्ती ए़ एम़ बदर यांच्या खंडपीठासमोर सुनवाईस आली होती. यावेळी अ‍ॅड़ ईरपतगिरे यांनी साखर आयुक्त, साखर सहसंचालक, नांदेड, लेखापरिक्षक वर्ग-एक (साखर) हे कारखान्यातील व्यवहाराबाबत कारवाई न करता कारखान्याच्या पदाधिकारी, कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत जिल्हा न्यायाधीशांमार्फत सदरील अधिकारी, कारखान्याचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची विनंती केली होती़ यावर उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेवून लेखापरिक्षक एस़ आऱ वाकोडे यांनी त्यांच्या अहवालामध्ये नमूद केलेल्या त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या नाहीत किंवा सहकार खात्याला सदरील त्रुटीबाबत कार्यवाही करावी वाटली नाही, असा निष्कर्ष काढला़ लेखापरिक्षण अहवाल उपलब्ध असताना लेखापरिक्षक एस़ आऱ वाकोडे यांच्याकडून पुन्हा अहवाल मागवून घेण्यात आला होता. यावरून प्रतिवादी अधिकारी जाणीवपूर्वक कारखान्याच्या संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत आहेत, असे याचिकाकर्त्याच्या म्हणण्यात तथ्य दिसून येते, असे मत उच्च न्यायालयाने नोंदविले़ तसेच प्रतिवादी स्वच्छ मनाने न्यायालयासमोर आले नाही व प्रकरणाची न्यायालयीन छानणी टाळत आहेत़ त्यामुळे याचिकेतील सर्व प्रतिवादींची चौकशी करण्याची आवश्यकता आहे, असा निष्कर्ष काढून साखर आयुक्त, साखर सहसंचालक नांदेड, लेखापरिक्षक वर्ग -एक (साखर), कारखान्याचे अधिकारी यांची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने निवृत्त जिल्हा न्यायाधीशांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करावी, असे आदेश ३ डिसेंबर २०१४ रोजी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते.दरम्यान, राज्य शासनाच्या पणन व सहकार विभागाने ४ मार्च रोजी या प्रकरणाच्या चौकशीसाठी सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश एस. पी. मुळे यांची नियुक्ती केली असून, त्यांनी आठ महिन्यांत चौकशी पूर्ण करून चौकशीचा अहवाल शासनाकडे सादर करावा, असे सांगितले आहे. खंडपीठाने दिलेल्या निकालानुसार या चौकशीची कार्यकक्षा तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या दि. २००६-०७ ते २०१०-११ या कालावधीतील लेखापरिक्षण अहवालापुरती व या निकालातील बाबीपुरती राहील, असेही शासनाने याबाबत जारी केलेल्या आदेशामध्ये नमूद केले आहे. (प्रतिनिधी)तेरणा कारखान्याचा ५ मे २०१२ रोजीचा लेखापरिक्षण अहवाल उपलब्ध असतानाही उच्च न्यायालयाने पुन्हा लेखापरिक्षक एस़ आऱ वाकोडे यांच्याकडून अहवाल मागविला आहे. वाकोडे यांनी ३१ आॅक्टोबर २०१३ रोजी तो अहवाल न्यायालयात सादर केला़ त्यात परत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ८३ नुसार तेरणा कारखान्यातील व्यवहाराची चौकशी करण्याची गरज वाकोडे यांच्या लेखापरिक्षण अहवालात नमूद करण्यात आली होती.