ट्रॅक्टर अचानक वळल्याने आयशर टेम्पोला थांबला; पाठीमागून तीन कार धडकल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 13:31 IST2025-11-08T13:30:37+5:302025-11-08T13:31:03+5:30
छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर बिल्डा फाट्याजवळ घटना, पाच जण जखमी

ट्रॅक्टर अचानक वळल्याने आयशर टेम्पोला थांबला; पाठीमागून तीन कार धडकल्या
फुलंब्री : छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावर बिल्डा फाट्याजवळ शुक्रवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास अचानक थांबलेल्या एका आयशर टेम्पोला पाठीमागून तीन कार जोरात धडकल्या. या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत.
बिल्डा फाट्याजवळ एक ट्रॅक्टर रस्ता ओलांडत असताना आयशर टेम्पो अचानक थांबला. त्याचवेळी पाठीमागून वेगाने आलेल्या कार (क्र. एमएच २० इजे २०६६), (क्र. एमएच २९ ईडी ९८३२) आणि (क्र. एमएच २० ईवाय ९९३३) या क्रमांकाच्या कारनी एकमेकांना जोरदार धडक दिली.
या अपघातात तिन्ही कारमधील सतीश मच्छिंद्र चव्हाण, सुरेंद्र वसंत सरदार, अशोक लक्ष्मण पारधे व इतर दोन जण असे पाच जण किरकोळ जखमी झाले, तसेच तिन्ही कारचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अपघातानंतर संबंधित आयशर टेम्पो चालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात कोणीही तक्रार दिली नव्हती.