पूर्व मतदारसंघात लक्षवेधी लढत

By Admin | Updated: October 2, 2014 00:50 IST2014-10-02T00:49:43+5:302014-10-02T00:50:52+5:30

औरंगाबाद : माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी पूर्व मतदारसंघातील २० इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.

In the eastern constituency, the fight against the elections | पूर्व मतदारसंघात लक्षवेधी लढत

पूर्व मतदारसंघात लक्षवेधी लढत

औरंगाबाद : माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी पूर्व मतदारसंघातील २० इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. जिल्ह्यात सर्वाधिक ३० उमेदवार रिंगणात असल्यामुळे येथे बहुरंगी व बहुढंगी लढत पाहायला मिळणार आहे.
सतत तीन वेळेस मतदारांचा भरघोस पाठिंबा लाभल्यानंतर चौकार ठोकण्यासाठी मैदानात उतरलेले पूर्वचे विद्यमान आ. राजेंद्र दर्डा, शिवसेनेच्या उमेदवार व शहराच्या महापौर कला ओझा, ज्येष्ठ मार्क्सवादी नेते डॉ. भालचंद्र कांगो, राष्ट्रवादी काँग्रेसचे जुबेर मोतीवाला, भाजपाचे अतुल सावे आणि मनसेचे सुमित खांबेकर हे या मतदारसंघातील प्रमुख उमेदवार आहेत. त्यामुळे मतदारसंघात चुरस वाढली असून, ही लढत लक्षवेधी ठरणार आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी ज्याप्रमाणे शेवटच्या तासा-दोन तासांत उमेदवारांनी गर्दी केली होती. त्याचप्रमाणे उमेदवारी मागे घेतानाही शेवटच्या तासात अधिक जोर दिसून आला. डोकेदुखी ठरू शकणारे उमेदवार बसविण्यासाठी सर्व पक्षीयांच्या वतीने विशेष प्रयत्न सुरू होते. प्रमुख पक्षांनी बंडखोरी मोडून काढली. शिवसेनेने सुहास दाशरथे यांचे बंड थंड केले. तसेच इतर अनेक अपक्षांनी येऊन आपली उमेदवारी मागे घेतली.
रिंगणातील उमेदवार
राजेंद्र दर्डा (काँग्रेस), कला ओझा (शिवसेना), डॉ. भालचंद्र कांगो (मार्क्सवादी कम्युनिस्ट), जुबेर मोतीवाला (राष्ट्रवादी काँग्रेस), अतुल सावे (भाजपा), सुमित खांबेकर (मनसे), कचरू सोनवणे (बसपा), डॉ. अब्दुल गफार कादरी (एमआयएम), मिर्झा निसार बेग (समाजवादी पार्टी), मोहम्मद किस्मतवाला कासीम (गरीब आदमी पार्टी), डॉ. विनोद चव्हाण (बहुजन मुक्ती पार्टी), शेख जियाउल्ला शेख अकबर (हिंदुस्थान जनता पार्टी).
अपक्ष उमेदवार असे :
कुंजबिहारी अग्रवाल, भरत कदम, जगदीश खरात, दिलीप ढेपे, उत्तमसिंह पवार, नितीन घुगे, पटेल शेख सलीम कासीम पटेल, मोबीनउद्दीन खदीरुद्दीन सिद्दीकी, लक्ष्मण प्रधान, लक्ष्मण कुऱ्हे, खुलास वाघ, विशाल पाखरे, शेख अ.रऊफ, शेख रफिक रज्जाक, शेख हबीब शेख गयास, साजीद पटेल बेगू पटेल आदी.
माघार घेतलेले उमेदवार
सुहास दाशरथे, मेहराज सिद्दीकी, पुष्पा जाधव, जालिंदर शेंडगे, भास्कर दवंडे, मो. नवाज मो.अशरफ, रमेश केरे, राजेश डोळे, रुक्मिणी शिंदे, शेख नदीम, तुषार शेजवळ, सुनील अवचरमल, सुधाकर वक्ते, विजय खंडागळे, मुकुंद दाभाडे, खान आगा खान, एस. पी. त्रिभुवन, चंद्रकांत गवई, उद्धव बनसोडे.

Web Title: In the eastern constituency, the fight against the elections