शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

प्रखर हिंदुत्वामुळे शिवसेनेने माझ्या वडिलांचे खच्चीकरण केले; साधे लोकसभेचे तिकीटही दिले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 19:33 IST

भाजप आमदार अतुल सावे यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

औरंगाबाद : प्रखर हिंदुत्वामुळे शिवसेनेने माझे वडील स्व. मोरेश्वर सावे यांचे खच्चीकरण केले. हिंदुत्वामुळेच शिवसेनेने त्यांना साधे लोकसभेचे तिकीट देखील दिले नाही. बुधवारच्या जाहीर सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकच बाजू मांडली, दुसरी बाजू त्यांनी सांगावी, असे आव्हान देत आ.अतुल सावे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वक्तव्यावर अनेक प्रश्नचिन्हे उभी केली.

शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी बुधवारच्या सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढविला. अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यासाठी शिवसेनेचे कुणीही आले नव्हते, असे फडणवीस सांगतात; परंतु मी त्यांना आठवण करून देतो की, औरंगाबादेतून शिवसेनेचे माजी खा. स्व. मोरेश्वर सावे हे शिवसैनिकांसह अयोध्येला गेले हाते. त्यांचे चिरंजीव अतुल सावे हे सध्या भाजपचे आमदार आहेत. मी आ. सावेंना विचारतो, फडणवीसांना जाऊन सांगा, माझे बाबा अयोध्येला गेले होते नसेल गेले तर तसेही सांगा, असे मुख्यमंत्री जाहीर सभेत बोलल्याने गुरुवारी आ. सावे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला उत्तर देताना सवाल केला. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी माझ्या वडिलांबाबत केलेले वक्तव्य दु:खद आहे. माझे वडील कारसेवक म्हणून अयोध्येला गेले होते. त्यांचे प्रखर हिंदुत्व शिवसेनेला आवडले नाही म्हणून त्यांचे वारंवार खच्चीकरण केले. त्यांना साधे लोकसभेचे तिकीटदेखील दिले नाही. लोकांनी त्यांना ‘धर्मवीर’ ही पदवी दिली, त्याचा देखील स्वीकार करण्यात शिवसेनेने आडकाठ्या आणल्या.

मुख्यमंत्र्यांनी पूर्ण कहाणी सांगावीबुधवारच्या सभेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी अर्धीच कहाणी सांगितली. सावे यांना शिवसेनेने लोकसभेत उमेदवारी का दिली नाही, याचे उत्तरदेखील मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे. प्रखर हिंदुत्ववादामुळेच शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली नाही. सावे कारसेवक म्हणून अयोध्येला जाताना, त्यांच्यासोबत रेल्वेने हजारो हिंदुत्ववादी बाबरी पतनासाठी अयोध्येत औरंगाबादेतून गेले होते. त्यावेळी शिवसेना, भाजप असा काही मुद्दा नव्हता. प्रखर हिंदुत्व एवढा एकच मुद्दा होता. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, शिवसेना, भाजप या पक्षसंघटनांचे कार्यकर्ते अयोध्येत गेले होते, असे आ.सावे म्हणाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAtul Saveअतुल सावेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा