शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दुरवस्थेने प्रवाशांचे हाल

By admin | Updated: July 25, 2014 00:27 IST

कडा : आष्टी येथील बसस्थानकात वेळेवर स्वच्छता केली जात नसल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

कडा : आष्टी येथील बसस्थानकात वेळेवर स्वच्छता केली जात नसल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अनेकदा स्थानकात अस्वच्छता असल्याने प्रवाशांना इमारतीबाहेर बसावे लागते. स्थानकाच्या आवारातही खड्ड्यामुळे अनेक ठिकाणी रस्ता चिखलमय झाला आहे.आष्टी येथील बसस्थानक हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. येथील बसस्थानक तब्बल ४० वर्षापूर्वीचे आहे. येथे तालुक्यातील विविध ठिकाणचे ग्रामस्थ सातत्याने ये-जा करीत असतात. तसेच बीड, जामखेड, अहमदनगर आदी ठिकाणी ये-जा करणारे प्रवासीही येथे येत असतात. त्यामुळे येथे अनेकदा प्रवाशांना बसची वाट पहात तास ते दीड तास बसावे लागते. बसस्थानकाच्या आवारात काही प्रवासी फळांच्या साली टाकतात. तसेच इतर प्लॅस्टिकचा कचराही येथे टाकला जातो. बसस्थानकाच्या आवारात वेळेवर स्वच्छता केली जात नसल्याने येथे येणाऱ्या प्रवाशांना घाणीची दुर्गंधी सहन करावी लागते. त्यामुळे येथे वेळेवर स्वच्छता करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केली आहे. यासह बसस्थानकाच्या आवारात काहींनी अनधिकृत अतिक्रमणही केले आहे. यामुळे बसस्थानकात बस येण्यासह अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे बसस्थानकाच्या आवारात झालेले अतिक्रमण हटविण्याची मागणी दादा जगताप यांनी केली आहे. दरम्यान, येथील स्वच्छतेसह बांधकामासाठी दोन वेळेस बीओटी तत्वावर टेंडरही काढले होते. मात्र, या टेंडरमधील अटींची पूर्तता करणे, अवघड असल्याने टेंडर भरण्यास कोणीही धजावले नसल्याचीही येथे चर्चा असल्यााचे संजय खंडागळे यांनी सांगितले. या बसस्थानकात प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याने येथे सोयी पुरवाव्यात अशी मागणी संगिता गिते यांच्यासह प्रवाशांमधून होत आहे.बसस्थानकाच्या आवरात खड्डे पडले आहेत. यामध्ये माती जमा झाली आहे. आता पाऊस पडल्याने येथे चिखलही झाला आहे. त्यामुळे चालकांना बस चालविण्यासही अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, याबाबत आगारप्रमुख सचिन शिंदे म्हणाले की, स्वच्छतेचे टेंडर कोणी घेत नसल्याने काम रखडले आहे. (वार्ताहर)बसस्थानकाच्या इमारतीला पावसाळ्यात गळतीबसस्थानकाच्या इमारतीला पावसाळ्यात गळतीही लागते. पाऊस पडल्यानंतर बसस्थानकाच्या इमारतीमध्ये पाणीही साचते. यामुळे बसस्थानकाच्या इमारतीत चिखलही होतो. यामुळे वेळप्रसंगी प्रवाशांना चिखलातही बसावे लागते.बसस्थानकाची इमारत जीर्ण झाल्याने येते नवीन इमारत बांधण्याची मागणीही सामाजिक कार्यकर्ते दादा गव्हाणे यांनी केली आहे.