शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने फेरले पाच लाख हेक्टर पेरण्यांवर पाणी

By admin | Updated: July 3, 2014 00:16 IST

दिनेश गुळवे, बीड यावर्षी पुन्हा दुष्काळाचा फेरा पडला आहे. पावसाने तोंड फिरविल्याने शेतकऱ्यांचा जीव कासावीस होऊ लागला आहे. ‘

दिनेश गुळवे, बीडयावर्षी पुन्हा दुष्काळाचा फेरा पडला आहे. पावसाने तोंड फिरविल्याने शेतकऱ्यांचा जीव कासावीस होऊ लागला आहे. ‘आता तरी पाऊस पाड रे बा विठ्ठला’ अशी आर्त हाक शेतकरी विठ्ठलाकडे करू लागला आहे. पाऊस नसल्याने तब्बल पाच लाख हेक्टरवरील पेरण्या खोळंबलेल्या आहेत. गेल्यावर्षी जून अखेर जिल्ह्यात अडीच लाख हेक्टर पेरण्या झाल्या होत्या. यावर्षीमात्र अद्याप शेतकऱ्यांनी ‘चाड्यावर मूठ’ धरलेलीच नाही.बीड जिल्ह्यात ५ लाख ६२ हजार ७०० हेक्टर क्षेत्र खरीप पेरणीची आहे. जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, बाजरी, ज्वारी, तीळ आदी पिकांची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात. गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण मुबलक होते. गतवर्षी जून अखेर १३३ मि.मी. पाऊस झाला होता. यावर्षी मात्र पावसाने दडी मारली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ३३ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अद्याप पावसाची एकही सर पडलेली नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असते. कापूस शेतकऱ्यांसाठी ‘पांढरं सोनं’ असल्याने शेतकरी रात्रंदिवस मेहनत घेऊन कापसाची लागवड करतात. गेल्यावर्षी कापसाचे उत्पन्न समाधानकारक झाल्याने शेतकऱ्यांकडे चार पैसे शिल्लक होते. यातून शेतकऱ्यांनी मशागतीसह बियाणे खरेदीही केली आहे. जिल्ह्यातील शेतीच्या मशागती पूर्ण झाल्या असून पेरणीसाठी शेतकऱ्यांची डोळे आकाशाकडे लागली आहेत. मात्र आता महिना होत आला तरी पाऊस पडला नसल्याने जिल्ह्यात केवळ ६ हजार हेक्टरवर कापसाची लागवड झालेली असून इतर पिकांचीही सहा हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. शेतकऱ्यांकडे काही प्रमाणात पाणी आहे. या पाण्यावर ठिबकद्वारे ही लागवड झालेली आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी १ जुलै पर्यंत २ लाख ४५ हजार ९०० हेक्टरवर लागवड झाली होती. ही पेरणी एकूण पेरणी क्षेत्राच्या ४४ टक्के झाली होती. यामध्ये कापूस, खरीप ज्वारी, बाजरीसह इतर पिकांचा समावेश असल्याचे कृषी विभागातील बिनवडे यांनी सांगितले. गेल्या वर्षी जिल्ह्यात १ जुलैपर्यंत उडीद, भात व तीळ या पिकांचा पेराही बऱ्यापैकी झाला होता. या वर्षी या पिकांचा पेरा रखडला आहे.(भाग-२)वाण गतवर्षीची पेरणी (क्षेत्र हेक्टर मध्ये) यावर्षीची पेरणी कापूस १ लाख ५२ हजार ५०० हे. ६ हजार ५१९सोयाबीन ३८ हजार ५०० ३ हजार ९४५तूर ११ हजार ५०० ७००उडीद ३ हजार ३०० ००मूग ३ हजार ५०० ७६ हे.भात ३०० ००बाजरी २५ हजार ६०० ३००तीळ ४०० ००ज्वारी ५ हजार ८०० १ हजार १००पुरेशा पावसावरच लागवड करावीजिल्ह्यात आतापर्यंत पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी थोड्या ओलीवर पेरणी करू नये. पुरेशी ओल नसेल तर दुबार पेरणीची वेळ येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधानकारक पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये, असे मत जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय मुळे यांनी व्यक्त केले.