शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात जमिनीचे खरेदी व्यवहार ‘एव्हरग्रीन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2016 01:20 IST

शिरीष शिंदे , बीड जिल्ह्यात अवर्षणाचे हे चौथे वर्ष आहे. दुष्काळाचा परिणाम प्रत्येक क्षेत्रावर झाला असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र अशा परिस्थितीतही फ्लॅट, प्

शिरीष शिंदे , बीडजिल्ह्यात अवर्षणाचे हे चौथे वर्ष आहे. दुष्काळाचा परिणाम प्रत्येक क्षेत्रावर झाला असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र अशा परिस्थितीतही फ्लॅट, प्लॉट व बाँड विक्रीचा व्यवसाय तेजीत असल्याची बाब लोकमतने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. विशेष म्हणजे जिल्हा मुद्रांक कार्यालयास २०१५-१६ या आर्थिक वर्षात महिनागणिक कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळत ९८.५० टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे. त्यावरून दुष्काळात जमिनीचे भाव तेजीत असल्याची बाब स्पष्ट झाली आहे.बांधकाम व्यवसायात मंदीचे सावट असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. या अनुषंगाने राज्य शासनाने विकसित होणाऱ्या भागासाठीचे रेडी रेकनर (जमीन मूल्य दर) १० ते ११ टक्क्यांनी यंदा वाढविले आहेत. यावरून फ्लॅट, प्लॉट खरेदी व्यवहारात तेजी आहे, असे म्हणता येऊ शकते.जिल्हा मुद्रांक कार्यालयात प्लॉट, फ्लॅट व बाँडची विक्री होते. त्यातून महसूल गोळा होतो. प्रत्येक वर्षी शासनाकडून मुद्रांक कार्यालयास महसुलासाठी विशिष्ट उद्दिष्ट दिले जाते. बीड जिल्हा मुद्रांक कार्यालयास यावर्षी ९५ कोटींचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी ९३ कोटी ५७ लाख ७४ हजार रुपये महसूल म्हणजेच बीड जिल्हा मुद्रांक कार्यालयाने ९८.५० टक्के उद्दिष्ट गाठले आहे. २००८-२०१२ या कालावधीत जमिनीचे दर वाढले होते. त्यामुळे शासनाला जिल्हा मुद्रांक कार्यालयामार्फत विकसित होणाऱ्या भागांचे दर वाढविले गेले. त्यानुसार त्या त्या भागांचे जमीन मूल्य दर वाढविले गेले. आता प्रॉपर्टी खरेदीचा बाजार मंदावला असला तरी वाढविलेले दर कमी करणे शक्य नसल्याचे अधिकारी खाजगीत सांगत आहेत. त्यामुळे विकसित होणाऱ्या भागाचे भाव कायम चढेच राहणार आहेत.