शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पर्यटकांची पैठणकडे पाठ

By admin | Updated: August 2, 2014 01:43 IST

अनिल गव्हाणे, बिडकीन गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद ते पैठण रस्त्याची अवस्था सुधारली नसल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

अनिल गव्हाणे, बिडकीनगेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद ते पैठण रस्त्याची अवस्था सुधारली नसल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. याचा परिणाम पर्यटक व भाविकांवरही झाला असून पैठणकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची घटली आहे.पैठण हे दक्षिण काशी असल्याने या रस्त्यावर नेहमी वाहनांची गर्दी असते, तसेच औरंगाबाद जिल्ह्यात येणारे पर्यटक प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर उद्यानामुळे हमखासपणे पैठणलाही भेट देतातच; परंतु हे उद्यानही भकास झाल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद-पैठण रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यात वाळूच्या वाहनांमुळे रस्त्याची पार वाट लागली आहे. यामुळे पर्यटकांनी पैठणकडे पाठ फिरविली आहे. याचा फटका व्यावसायिकांनाही बसला आहे. बिडकीन, पैठण, जायकवाडी, चितेगाव येथील व्यवसायांवर मोठा परिणाम झाला आहे. हॉटेल व्यावसायिकांवर मंदी आली आहे.धोकादायक अरुंद पूलऔरंगाबाद-पैठण रस्त्यावरील बिडकीननजीक साई मंदिराजवळील अरुंद पुलाचे कठडे कित्येक वर्षांपासून तुटलेले असून हा अरुंद पूल धोकादायक बनला आहे. येथे अनेक वेळा अपघातही झाले आहेत. याकडे बांधकाम विभागाचे कायम दुर्लक्ष झाले आहे. लोकप्रतिनिधी मात्र हा रस्ता चारपदरी, सहापदरी करण्याचे आश्वासन देत आहेत. रुंदीकरण होईल तेव्हा होईल, तूर्त आहे त्या रस्त्याची दुरुस्ती केली तरी खूप झाले, अशा प्रतिक्रिया वाहनधारक देत आहेत. अतिक्रमणाचा विळखाहा रस्ता आधीच अरुंद, खराब असताना यावर अतिक्रमणही वाढले आहे. बिडकीन येथे तर कायम वाहतूक ठप्प होते. याकडे पोलिसांनीही लक्ष देणे गरजेचे आहे. एकंदरीत रस्त्याच्या जाचामुळे पर्यटकांची संख्या कमी होत आहे, ही चिंतेची बाब आहे.