शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय वर्चस्वाच्या लढाईतून मनभेद मैदानात

By admin | Updated: September 29, 2014 00:45 IST

नजीर शेख, औरंगाबाद एकेकाळी गुलमंडीवर आपल्या मैत्रीची ग्वाही देणारे आणि वर्तमानपत्रांना त्यासंबंधीच्या मुलाखती देणारे मात्र मागील दीड-दोन वर्षांत एकमेकांचे राजकीय वैरी झाले

नजीर शेख, औरंगाबादएकेकाळी गुलमंडीवर आपल्या मैत्रीची ग्वाही देणारे आणि वर्तमानपत्रांना त्यासंबंधीच्या मुलाखती देणारे मात्र मागील दीड-दोन वर्षांत एकमेकांचे राजकीय वैरी झालेले आ. प्रदीप जैस्वाल आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी हे एकदाचे एकमेकांसमोर उभे ठाकलेच. युती तुटली आणि तनवाणी यांनी औरंगाबाद मध्य मतदारसंघातून आ. जैस्वाल यांच्या विरोधात तनवाणी भूमिका घेण्याची संधी साधली. गुलमंडीवर राहणाऱ्या या दोन नेत्यांचे तसे पाहता कार्यक्षेत्रदेखील एकच राहिले. चंद्रकांत खैरे आमदार झाल्यानंतर आ. जैस्वाल यांनी गुलमंडीवर आपले वर्चस्व निर्माण केले. त्याचवेळी किशनचंद तनवाणी हे त्यांच्या बरोबरीने राहिले. जैस्वाल खासदार झाल्यानंतरच्या खूप वेळानंतर म्हणजे २००४-०५ या काळात तनवाणी यांनी महापौरपद भूषविले. २००४ साली औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून जैस्वाल यांचा पराभव झाल्यानंतर तनवाणी यांना आमदार होण्याचे वेध लागले. त्यांची ही इच्छा पक्षाने औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी उमेदवारी देऊन पूर्णही केली. मात्र, अशा मतदारसंघातून थेट जनतेशी संबंध येत नसल्याने तनवाणी यांना त्यात फारसा रस नव्हता. विधानसभेचा आमदार होण्याची त्यांची मनीषा कायम राहिली. २००९ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि औरंगाबाद मध्य हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला. त्यावेळी तनवाणी विधान परिषदेचे आमदार असल्याने विकास जैन यांना उमेदवारी मिळाली. जैस्वाल हे अपक्ष उभे राहून निवडून आले. त्यानंतर जैस्वाल हे पुन्हा स्वगृही परतले होते. याच काळात जैस्वाल आणि तनवाणी यांचे संबंध अधिक बिघडले.विधान परिषदेच्या २०१३ साली झालेल्या निवडणुकीत तनवाणी यांचा पराभव झाला. हा पराभव स्पष्ट दिसत असतानाही पक्षाच्या दबावापुढे त्यांचा नाइलाज झाला होता. पराभूत उमेदवाराची मानसिकता घेऊन तनवाणी काही दिवसांपासून वावरत असल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे राजकारणात टिकून राहणे ही तनवाणी यांची गरज बनली असताना जैस्वाल हे त्यामधील अडथळा ठरत असल्याचा तनवाणी यांचा समज आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार दोन हजार मतांनी पिछाडीवर राहिल्यानंतर तर तनवाणी यांची आमदार होण्याची तीव्र इच्छा उफाळून आली. जैस्वाल यांना कदाचित विधानसभेचे तिकीट मिळणार नाही, असा अंदाज तनवाणी बांधत होते.मात्र, जैस्वाल यांनाच तिकीट जाहीर झाल्याने तनवाणी यांचा पुरता बीमोड झाला. निवडणुकीची त्यांनी मोठी तयारी केली होती. प्रसंगी अपक्ष उभे राहण्याचीही त्यांची तयारी होती. तनवाणी यांना राजकीय अस्तित्वासाठी युती तुटल्याने आता भाजपाचा आधार मिळाला आहे. या काळात दोघांमध्ये कुठेही जाहीर वाद किंवा टीकाटिप्पणी झाली नसली तरी अंतर्गत धुसफूस चालूच होती. तनवाणी आणि जैस्वाल यांचे संबंध बिघडण्यामागे व्यावसायिक किंवा इतर काही कारणे आहेत का, याचा तर्क राजकीय वर्तुळात लावला जात असला तरी हे कारण राजकीयच असल्याचे गुलमंडी परिसरात बोलले जाते. दोघे मित्र आता राजकारणाच्या मैदानात एकमेकांना मात देण्याच्या प्रयत्नात आहेत.