शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टरांनाही होतोय औषध पुरवठा

By admin | Updated: August 3, 2014 01:14 IST

नांदेड : अनेक वैद्यकीय व्यावसायिकांकडे औषधविक्रीचा कुठलाही परवाना नसताना त्यांना ठोक औषध विक्रेत्यांकडून सर्व प्रकारच्या औषधांचा पुरवठा केला जात आहे़

नांदेड : अनेक वैद्यकीय व्यावसायिकांकडे औषधविक्रीचा कुठलाही परवाना नसताना त्यांना ठोक औषध विक्रेत्यांकडून सर्व प्रकारच्या औषधांचा पुरवठा केला जात आहे़ ही बाब बेकायदेशीर असून जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे़ त्यामुळे या ठोक औषध विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करावे, अशी मागणी यूआरपी हेल्थकेअर फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे़याबाबत संघटनेने अन्न व औषध प्रशासनाच्या सहआयुक्तांना निवेदन दिले आहे़ बोगस डॉक्टरांसह विविध पॅथीच्या डॉक्टरांना अवैधपणे करण्यात येणाऱ्या औषध पुरवठ्यामुळे चुकीचा वापर होवून अनेकांना जीव गमवावा लागला आहे़ विशेष म्हणजे कारवाई होत नसल्यामुळे हे ठोक विक्रेते डॉक्टरांना स्त्रीभ्रूृण हत्येसाठी लागणारी, झोपेची, गुंगीची, नशेची आदी औषधी बिनदिक्कतपणे पुरवठा करतात़ नियमानुसार ज्यांनी ही औषधी प्रिस्क्राईब करता येत नाहीत अशा विविध पॅथीसह बोगस वैद्यकीय व्यावसायिकांना अनिर्बंधपणे औषधपुरवठा करणाऱ्या औषध विक्रेत्यांनी मोठे जाळे निर्माण केले आहे़ याबाबत कोल्हापूर एफीडीएने कारवाईही केली होती़ त्यामुळे या ठोक औषध विक्रेत्यांचे रेकॉर्ड तपासावे तसेच रुग्णांची आर्थिक लूट व पिळवणूक करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे़ निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष उमेश खके, लोकसेवा मिशन फार्मासिस्टचे अध्यक्ष प्रसाद वाघमोडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत़ (प्रतिनिधी)