शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यावर दुष्काळाची गर्द छटा

By admin | Updated: July 6, 2014 00:24 IST

उस्मानाबाद : सलग तीन वर्षांचा दुष्काळ आणि उन्हाळ्यात झालेली गारपीट, अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे़

उस्मानाबाद : सलग तीन वर्षांचा दुष्काळ आणि उन्हाळ्यात झालेली गारपीट, अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे़ पावसाने ओढ दिल्याने यंदाचा खरीप हंगामही धोक्यात आला असून, आजवर केवळ ६ टक्के पेरणी झाली आहे़ पावसाअभावी जिल्ह्यातील तब्बल ८१ साठवण तलाव कोरडेठाक पडले असून, उर्वरित साठवण तलावात केवळ ३़३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे़ या परिस्थितीत चालू आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली नाही तर शहरासह ग्रामीण भागातही तीव्र पाणीटंचाईसह भीषण दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे़जिल्ह्यातील नागरिकांनी सलग तीन वर्षांचा भीषण दुष्काळ अनुभवला़ गतवर्षीच्या न भुतो न भविष्यती अशा दुष्काळाचाही जिल्ह्याने सामना केला़ दुष्काळानंतर चांगल्या परिस्थितीची अपेक्षा करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रबी हंगाम अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हिरावून नेला़ शासनाकडून मिळणारा तुटपुंजा निधीही अनेक शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही़ गतवर्षी जुलै महिन्यात जवळपास ५६ टक्के पेरणी झाली होती़ यंदा मात्र, पावसाने मोठी ओढ दिल्याने जिल्ह्यातील खरिपाच्या ३ लाख, ९० हजार, ५०० हेक्टरपैकी केवळ २५़३८०० हेक्टरवर ६ टक्के पेरणी झाली आहे़ गत महिन्यात तुळजापूर व उमरगा तालुक्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली होती़ त्यामुळे तुळजापूर तालुक्यातील १८़६६०० हेक्टरवर तर उमरगा तालुक्यातील ६़१००० हेक्टरवर पेरणी झाली आहे़ उर्वरित तालुक्यातील पेरण्या रखडल्या आहेत़ पेरणीपूर्व मशागतीची कामे केलेल्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले असून, चालू आठवड्यात पाऊस झाला नाही, तर अनेक पिकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होणार आहे़ जिल्ह्यातील २११ प्रकल्पापैकी ७७ लघु आणि ४ मध्यम असे ८१ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत़ यात परंडा तालुक्यातील साकत, खंडेश्वरी, चांदणी व कळंब तालुक्यातील रायगव्हाण या मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे़ तर उमरगा तालुक्यातील जकापूर, तुरोरी, भूम तालुक्यातील संगमेश्वर, परंडा तालुक्यातील खासापुरी या प्रकल्पातील पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे़ उर्वरित साठवण तलावात २१़४९६ दलघमी म्हणजे ३़३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे़ (प्रतिनिधी)