शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये दिव्यांगाला हवाय वाहतूक परवाना; रिक्षा चालवून बनायचे आहे सक्षम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 19:10 IST

रिक्षा चालविताना ब्रेक लावण्यासाठी केवळ उजव्या पायाचा उपयोग होतो. केवळ डाव्या पायाला अपंगत्व आहे. आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी रिक्षा चालविण्यासाठी लायसन्स पाहिजे; परंतु कागदपत्रांची पूर्तता करण्यात सहा महिन्यांपासून आरटीओ कार्यालयात चकरा मारण्याची वेळ एका दिव्यांगावर ओढावली आहे.

ठळक मुद्देसंतोष पवार असे या दिव्यांगाचे नाव आहे. त्याच्या डाव्या पायाला ४७ टक्के अपंगत्व आहे. गेल्या सहा महिन्यांपासून रिक्षा चालविण्यासाठी लायसन्स मिळविण्यासाठी तो धडपडत आहे.

औरंगाबाद : रिक्षा चालविताना ब्रेक लावण्यासाठी केवळ उजव्या पायाचा उपयोग होतो. केवळ डाव्या पायाला अपंगत्व आहे. आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी रिक्षा चालविण्यासाठी लायसन्स पाहिजे; परंतु कागदपत्रांची पूर्तता करण्यात सहा महिन्यांपासून आरटीओ कार्यालयात चकरा मारण्याची वेळ एका दिव्यांगावर ओढावली आहे.

संतोष पवार असे या दिव्यांगाचे नाव आहे. त्याच्या डाव्या पायाला ४७ टक्के अपंगत्व आहे. गेल्या सहा महिन्यांपासून रिक्षा चालविण्यासाठी लायसन्स मिळविण्यासाठी तो धडपडत आहे. त्याने आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी रिक्षा चालविण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु त्यासाठी त्यांच्याकडे लायसन्स नसल्याने त्याला रिक्षा चालवता येत नाही. त्याच्या केवळ डाव्या पायाला अपंगत्व आहे, मात्र रिक्षाचे ब्रेक उजव्या बाजूने असते. तसेच क्लच आणि गेअर हे देखील हाताने हाताळले जातात. त्यामुळे डाव्या पायाच्या अपंगत्वाने रिक्षा चालवण्यात कोणताही अडसर येत नसल्याचे तो सांगतो. 

असे असूनही वेळोवेळी मोटार वाहन निरीक्षकांनी आधी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे आणि नंतर घाटी रुग्णालयाचे प्रमाणपत्र आणण्यास सांगितले. हे प्रमाणपत्र देताना डॉक्टरांनी संतोषला रिक्षा चालवता येते किंवा नाही याची चाचणी घेतल्यानंतरच प्रमाणपत्र दिले; परंतु यानंतरही आरटीओ कार्यालयाचे निरीक्षक त्याच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास तयार नाही. 

अधिकार्‍यांनी घेतली दखलही बाब सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांच्या निदर्शनास आली. तेव्हा त्यांनी सर्व बाजूंनी पडताळणी केली. तेव्हा संतोष पवार याना लायसन्स देण्यात कोणतीही अडचण नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी हरकत नाही असा शेरा मारला. तरीही निरीक्षक त्यांच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करत नसल्याने नकाते यांनी स्वत:च पवार यांची चाचणी घेऊन परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRto officeआरटीओ ऑफीस