शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

चालकानेच पळविला ट्रक

By admin | Updated: July 9, 2014 00:29 IST

येणेगूर : ट्रकसह ३१ लाखांचा मुद्देमाल लंपास केल्या प्रकरणात फिर्यादी चालकाचाच हात असल्याचे समोर आले

येणेगूर : ट्रकसह ३१ लाखांचा मुद्देमाल लंपास केल्या प्रकरणात फिर्यादी चालकाचाच हात असल्याचे समोर आले असून, मुरूम पोलिसांनी आठ दिवसातच चोरीचा छडा लावला आहे़ पोलिसांनी शनिवारी चालकासह मुद्देमाल जप्त केला़ पोलिसांनी सांगितले की, उमरगा तालुक्यातील आष्टामोड नजीक ढाब्यावर लावलेली ट्रक (क्ऱएम़एच़२५/ यू ७५७६) ही मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद चालक युसूफ बशीर विजापुरे (राग़ुंजोटी ता़उमरगा) याने दिली होती़ त्यात ट्रकसह जवळपास ३१ लाख रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते़ तक्रार दाखल झाल्यानंतर मुरूम पोलिस ठाण्याचे सपोनि एस़पी़शिरसाट यांनी सहकारी धनू चव्हाण, अनिल जोशी, किरण औताडे, चालक विनायक गायकवाड यांच्यासह तपासाची चक्रे वेगाने फिरविली़ फिर्यादी विजापुरे याच्या संशयास्पद हालचालींमुळे त्याच्यावरच पोलिसांचा संशय बळावला़ त्यास ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखविताच त्याने कट रचून ट्रक लंपास केल्याची माहिती दिली़ त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आळंद तालुक्यातील खंडाळा या गावात लावलेला ट्रक मुद्देमालासह जप्त केला़ चालकाने बॅटरीसाठी लागणारे शिसे परस्पर विकून पैसे हडप करण्याचा प्रयत्न पोलिसांनी तक्रार दाखल होताच आठ दिवसात हाणून पाडला़ पुढील तपास सपोनि शिरसाट हे करीत आहेत़महिलेचा मृत्यूयेणेगूर : राजेश गिरी याची पत्नी वसंती ही स्टोव्हवर स्वयंपाक करताना अचानक स्टोव्हचा भडका उडाल्याने गंभीररीत्या भाजली. सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. ही घटना ८ जून रोजी घडली होती. सोलापूर सदर बजार पोलीस चौकीतून शुन्य क्रमांकाने दाखल करण्यात आला होता. मात्र आकस्मिक मृत्यूची नोंद मुरूम पोलीस ठाण्यास प्राप्त होण्यास महिन्याचा कालावधी लागला असून, सोमवारी या प्रकरणातील महिलेच्या मृत्यूची नोंद मुरूम पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. राजेश गिरी हे मूळचे नेपाळ येथील असून, येथे ते गुरखा म्हणून काम पाहतात.