शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
3
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
4
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
5
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
6
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
7
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
8
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
9
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
10
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
11
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
12
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
13
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
14
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
15
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
16
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
17
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
18
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
19
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
Daily Top 2Weekly Top 5

क्रेनखाली चेंगरून चालकाचा मृत्यू

By admin | Updated: June 29, 2014 00:40 IST

परंडा : विहीर खोदाईचे काम चालू असताना क्रेन विहिरीत कोसळल्याने याखाली चेंगरून एकाचा जागीच मृत्यू तर दोघेजण गंभीर जखमी झाले.

परंडा : विहीर खोदाईचे काम चालू असताना क्रेन विहिरीत कोसळल्याने याखाली चेंगरून एकाचा जागीच मृत्यू तर दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना तालुक्यातील खानापूर शिवारात २८ जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. यातील जखमींवर बार्शीच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत मिळालेली माहिती अशी की, परंडा-पिंपरखेड रस्त्यावरील खानापूर शिवारात रामचंद्र कुदळे (रा. खानापूर) यांच्या शेतात विहीर खोदाईचे काम चालू आहे. यावेळी आठ परस खोलवर तिघे कामगार खोदाई केलेले मटेरियल क्रेनच्या बकेटमध्ये भरण्याचे काम करीत होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास हे काम सुरू असतानाच अचानक बकेटसह क्रेन विहिरीत कोसळला. यात क्रेनचालक श्रीमंत (नाना) शिवाजी काळे (वय ३५) हेही क्रेनसह विहिरीत पडून क्रेनखाली चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत विहिरीत असलेले धनाजी दत्तात्रय काशिद (वय ३०) व ज्ञानदेव भागवत बारसकर (वय ३०, दोघे रा. जाकेपिंपरी, ता. परंडा) यांच्या अंगावर क्रेन कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले. यातील धनाजी कााशिद यांचा खुबा पूर्णपणे निकामी झाला असून, ज्ञानदेव बारसकर यांचा पाय व हात फ्रॅक्चर होवून दोघांच्या शारीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. या दोघांनाही बार्शी येथे खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.मयत श्रीमंत काळे यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असून, याप्रकरणी परंडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, विहीर मालक रामचंद्र कुदळे हे मात्र घटना घडल्यापासून फरार आहेत. पोलिस ठाण्यामध्ये तणावरूग्णालयात डॉक्टरांनी श्रीमंत काळे हे मृत झाल्याचे घोषित केल्यानंतर श्रीमंत काळे यांचे बंधू शिवाजी काळे, मनोहर काळे, पोपट काळे, पोलिस पाटील शांतीकुमार गरड, शहाजी पवार, सरपंच ज्ञानेश्वर काळे, राजेंद्र लांडगे, मनोज काळे आदी नातेवाईक परंडा पोलिस ठाण्यात गेले. त्यांनी पोलिस निरीक्षक हणमंत वाकडे यांची भेट घेऊन विहीर मालकावर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. परंतु, यावेळी वाकडे यांनी या लोकांना ठाण्याबाहेर काढा, असे फर्मान तेथील पोलिस कर्मचाऱ्यांना सोडले. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर केल्याने नातेवाईकांनी श्रीमंत यांचे शव ताब्यात घेण्यास नकार दिला. यामुळे पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी जि. प. गटनेते दत्ता साळुंके यांनी मध्यस्थी करून तणाव निवळला व नातेवाईकांनी काळे यांचे प्रेतही ताब्यात घेतले. वडिलांना भोवळघटनेची माहिती मिळताच टाकळी (ता. परंडा) येथील श्रीमंत काळे यांच्या नातेवाईकांनी परंडा उपजिल्हा रूग्णालयाकडे धाव घेतली. येथे डॉक्टरांनी काळे यांना मयत घोषित केल्यानंतर हा धक्का सहन न झाल्याने श्रीमंत यांचे वडील शिवाजी काळे हे रूग्णालय आवारातच भोवळ येवून पडले.