लग्नखर्चासाठी वडिलांवर कर्जाचा डोंगर नको; सुसाईड नोट लिहून तरुणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 18:47 IST2021-02-24T18:46:21+5:302021-02-24T18:47:35+5:30

girl commits suicide by writing suicide note आपल्या लग्नाखर्चासाठी वडिलांवर कर्जाचा डोंगर होईल या भावनेने तरुणी चिंतीत होती.

Don’t want to put a mountain of debt on the father for wedding expenses; girl commits suicide by writing suicide note | लग्नखर्चासाठी वडिलांवर कर्जाचा डोंगर नको; सुसाईड नोट लिहून तरुणीची आत्महत्या

लग्नखर्चासाठी वडिलांवर कर्जाचा डोंगर नको; सुसाईड नोट लिहून तरुणीची आत्महत्या

करमाड (औरंगाबाद ) : हलाखीची परिस्थिती असल्याने वडिलांना लग्नाखर्चासाठी त्रास नको, अशी सुसाईड नोट लिहून औरंगाबाद तालुक्यातील लाडगाव येथील एका २० वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. वैशाली राधकीसन जाधव असे मृत तरुणीचे नाव आहे. 

वैशालीला चार मोठ्या बहिणी आहेत. आई-वडिलांनी चौघींचेही लग्न मोठ्या थाटामाटात लावले आहेत. आई- वडिलांची वैशालीचे देखील चांगले लग्न करण्याचे स्वप्न होते. मात्र, आता त्यांची परिस्थिती हलाखीची आहे. आपल्या लग्नाखर्चासाठी त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होईल या भावनेने वैशाली चिंतीत होती. यातूनच वैशालीने बुधवारी सकाळी राहत्या घरी आत्महत्या करून जीवन संपवले. सुसाईड नोटमध्ये तिने कुणालाही या आत्महत्येस जबाबदार धरलेले नाही. वैशालीच्या पाश्चात्य आई, वडील, चार बहिणी, दोन भाऊ असा परिवार आहे. करमाड पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पोनी संतोष खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संतोष पाटील पुढील तपास करत आहेत.

Web Title: Don’t want to put a mountain of debt on the father for wedding expenses; girl commits suicide by writing suicide note