कुत्र्याला दिली 'सुपारी'! मालकाने 'छू' म्हणताच कुत्र्याने महिलेचे लचके तोडले; रस्त्यावर फरफटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 15:08 IST2026-04-08T15:06:53+5:302026-04-08T15:08:09+5:30

कुत्रा मालकावर गुन्हा; महिलेच्या हाताला आणि मनगटाला कुत्र्याने घेतला कडक चावा.

Dog Attack in Chhatrapati Sambhajinagar: Pet Dog Mauls and Drags Woman After Owner's Command | कुत्र्याला दिली 'सुपारी'! मालकाने 'छू' म्हणताच कुत्र्याने महिलेचे लचके तोडले; रस्त्यावर फरफटले

कुत्र्याला दिली 'सुपारी'! मालकाने 'छू' म्हणताच कुत्र्याने महिलेचे लचके तोडले; रस्त्यावर फरफटले

छत्रपती संभाजीनगर: शहरातील संजयनगर गल्ली क्रमांक २ मध्ये एका पाळीव कुत्र्याने नोकरीवर जाणाऱ्या महिलेवर भीषण हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मालकाने इशारा दिल्यानंतर कुत्र्याने अचानक हल्ला केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. ४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात ४१ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली असून, आरोपी कुत्रा मालक मिस्त्राम याच्याविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भररस्त्यात महिलेला फरफटत नेले
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला राजनगर येथील आरोग्य केंद्रात नोकरीला आहे. त्या नेहमीप्रमाणे सकाळी ९ वाजता पायी कामावर जात होत्या. यावेळी आरोपी मिस्त्राम आपल्या कुत्र्यासह घरासमोर बसलेला होता. पीडित महिला जवळ येताच त्याने कुत्र्याला 'छू, गो' असे म्हणून चिथावणी दिली. मालकाचा इशारा मिळताच कुत्र्याने थेट महिलेवर झडप घातली आणि त्यांच्या हाताचा, तळहाताचा आणि मनगटाचा लचका तोडला. हल्ल्यामुळे महिला खाली पडताच कुत्र्याने त्यांना काही अंतरापर्यंत फरफटत नेल्याने त्यांच्या गुडघ्यालाही गंभीर इजा झाली आहे.

मालकाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
पाळीव कुत्र्याला अशा प्रकारे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर सोडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. जखमी महिलेने आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांची सुटका केली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे. पाळीव कुत्र्यांच्या वर्तणुकीला आणि त्यांच्यामुळे होणाऱ्या अपघातांना मालक किती जबाबदार आहेत, असा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Web Title : पालतू कुत्ते का हमला: मालिक के आदेश पर महिला गंभीर रूप से घायल।

Web Summary : संभाजीनगर में एक पालतू कुत्ते ने मालिक द्वारा उकसाए जाने पर एक महिला पर हमला कर दिया। कुत्ते ने पीड़िता को काटा और घसीटा, जिससे गंभीर चोटें आईं। पुलिस ने मालिक के खिलाफ लापरवाही का मामला दर्ज किया है।

Web Title : Pet dog attack: Woman severely injured after owner's command.

Web Summary : In Sambhajinagar, a pet dog attacked a woman after its owner instigated it. The dog bit and dragged the victim, causing serious injuries. Police have registered a case against the owner for negligence.