शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
5
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
6
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
7
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
8
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
9
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
10
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
11
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
12
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
13
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
14
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
15
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
16
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
17
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
18
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
19
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
20
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

विकासात खोडा नको - दानवे

By admin | Updated: July 27, 2014 01:15 IST

केदारखेडा: विकास कामांत कोणताही खोडा आणू नका, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

केदारखेडा: विकास कामांत कोणताही खोडा आणू नका, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. केदराखेडा येथील पूर्णा नदीवर बांधण्यात येणाऱ्या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ़ संतोष सांबरे यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मण मळेकर, शिवाजी थोटे, कैलास पुंगळे, कमालाकर साबळे, माधवराव हिवाळे, मुकेश पांडे, रामेश्वर पडोळ आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना दानवे म्हणाले, सिंचनाचा विकास साधत असताना गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही नद्या जोडण्याचे मोठे काम केलेले आहे़ याबरोबरच पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून गावांना पक्के रस्ते केले़ शिवाय धरण प्रकल्प उभारुन शेतकऱ्यांच्या जमिनी सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न केला़ परंतु, आम्ही केलेल्या विकास कामावर गप्पा मारण्याचा सपाटा आघाडी सरकारचे लोकप्रतिनिधी लावत आहेत. विकास कामे करु नका, मात्र आम्ही केलेल्या विकास कामात त्यांनी किमान खोडा घालू नये, असे स्पष्ट मत दानवे यांनी व्यक्त केले. शेतकरी सधन व्हावा हीच आशा उरी बाळगून गिरजा-पूर्णा नदीवर आज दहाव्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे भूमिपूजन केले. या पैकी नऊ कोल्हापुरी बंधाऱ्याचे पाणी शेतकऱ्यांना उपयोगात येत आहे़ या माध्यामातून गिरजा -पूर्णा नदीवर ५० किलोमीटरपर्यंत पाणीसाठा होत आहे. केदारखेडा येथील कोल्हापुरी बंधाऱ्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मी व आ़ सांबरे यांनी अहोरात्र प्रयत्न करुन मंजूर केला आहे. या बंधाऱ्याचे काम कोणीही रोखू शकत नाही ़ या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेशराव मुरकूटे यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रा़ गजानन तांबडे यांनी मानले़
या प्रसंगी मधुकरराव तांबडे, रमेश पांडे, मुकेश पांडे, सरपंच गोविंदराव बकाल, अंकुश जाधव, विठ्ठल पेरे, विलास मुरकूटे, नानासाहेब हिवाळे, कृष्णा ठोंबरे, पप्पू ठोंबरे, रामलाल चव्हाण, नानासाहेब वानखेडे, रुस्तुम सहाणे, दादाराव वाल्डे, बबनराव ठोंबरे, संजय खरात, रमेश पवार, बालासाहेब करतारे यांच्यासह परिसरातील शेतकरी तसेच ग्रामस्थांची उपस्थिती होती. (वार्ताहर)