शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

डीएमआयसी, आॅटो क्लस्टरच्या प्रगतीचा उद्योजकांसमवेत आढावा

By admin | Updated: July 16, 2014 01:27 IST

औरंगाबाद : शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी आज मराठवाड्याच्या विकासाशी संबंधित प्रकल्पांवर चेम्बर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरच्या (सीएमआयए) शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली.

औरंगाबाद : शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी आज दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी), आॅटो क्लस्टर, स्मार्ट सिटी आदी मराठवाड्याच्या विकासाशी संबंधित जिव्हाळ्याच्या प्रकल्पांवर चेम्बर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरच्या (सीएमआयए) शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली.सीएमआयएचे अध्यक्ष मुनीष शर्मा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राजेंद्र दर्डा यांची भेट घेतली. उद्योगपती राम भोगले यांनी मंत्र्यांना आॅटो क्लस्टरच्या प्रगतीविषयी माहिती दिली. या प्रकल्पाला जागा देण्यापासून केलेल्या मदतीबद्दल त्यांनी राजेंद्र दर्डा यांचे आभारमानले.डीएमआयसीच्या कोअर कमिटीमध्ये स्थानिकांना प्रतिनिधित्व दिले पाहिजे, अशी विनंती शिष्टमंडळाने राजेंद्र दर्डा यांना केली. डीएमआयसीमध्ये उत्पादित झालेली उत्पादने जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, मुंबई येथे सुलभरीत्या पोहोचविण्यासाठी एक डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर विकसित करावा, तसेच तेथे एखादा उद्योग आणि त्यावर अवलंबून असलेले काही लघुउद्योग आणावेत, म्हणजे अन्य भारतीय आणि परदेशी उद्योजक प्रकल्पात रस दाखवतील, अशी सूचना यावेळी उद्योगपतींनी केली.केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट मंजूर केली आहे. ही संस्था औरंगाबादेत यावी यासाठी शालेय शिक्षणमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी सूचना शिष्टमंडळाने केली. यावर राजेंद्र दर्डा यांनी वरील सर्व प्रश्न धसास लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे १७ जुलै रोजी औरंगाबादेत येत आहेत. त्यांच्याशी सीएमआयए शिष्टमंडळाने वरील सर्व विषयांवर चर्चा करावी, अशी सूचना त्यांनी केली.शिष्टमंडळात मुनीष शर्मा, सीएमआयएचे सचिव रितेश मिश्रा, राम भोगले, उल्हास गवळी, मुकुंद कुलकर्णी, आशिष पोकर्णा आणि गुरुप्रीतसिंग बग्गा यांचा समावेश होता.महत्त्वाची भूमिकाडीएमआयसी प्रकल्पान्वये शेंद्रा-बिडकीनचा ‘अर्ली बर्ड व्हेंचर’ म्हणून विकास करण्यासाठी, तसेच तेथे ‘स्मार्ट सिटी’ विकसित करण्यासाठी राजेंद्र दर्डा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, हे येथे उल्लेखनीय आहे.