शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिका कर्मचाऱ्यांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा

By admin | Updated: July 2, 2014 00:32 IST

हिंगोली : विविध मागण्यांसाठी नगर पालिका कर्मचाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

हिंगोली : विविध मागण्यांसाठी नगर पालिका कर्मचाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राज्यातील नगर पालिका कर्मचाऱ्यांचे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे १०० टक्के वेतन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे करावे, नगर पालिकांमधील अनुकंपाधारकांच्या नेमणुकीसाठी स्थायी- अस्थायी पदाची अट न घालता तत्काळ नियुक्त्या कराव्यात, राज्यातील नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी विशेष अनुदान देण्यात यावे तसेच ३८ पालिकांचे थकीत अनुदान, महागाई भत्ता तत्काळ वितरीत करण्यात यावा, राज्यातील ७८ नगरपालिकांचे कपात होत असलेले सहाय्यक अनुदान त्वरीत थांबवून कपात केलेली रक्कम त्या-त्या पालिकांना वितरीत करावी, शैक्षणिक पात्रता व मूळ विकल्प दिल्यानुसार लेखा शाखेत कर व प्रशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यात यावे, मुख्याधिकारी पदावर ५० टक्के कर्मचारी पदोन्नतीने भरण्यात यावेत आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष विश्वनाथ घुगे यांच्या नेतृत्वाखालील मंगळवारी सकाळी नगरपालिका कार्यालयापासून मोर्चा काढण्यात आला. शहरातील विविध मार्गांवरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाला. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी विश्वनाथ घुगे, शिंदे, बाळू बांगर, राठोड, गायकवाड, भजवणे, पंडीत शिंदे, विजय आठवले, माधव आठवले, राजू आठवले आदींनी सहभाग नोंदविला. (जिल्हा प्रतिनिधी)नगरपालिकेत कक्षांना कुलूपनगरपालिका कर्मचाऱ्यांचा मंगळवारी मोर्चा असल्याने सकाळी ११ पासून हिंगोली नगरपालिकेतील सर्वच कक्षांना कुलूप लावण्यात आल्याचे दिसून आले. नगरपालिकेमध्ये एकही कर्मचारी किंवा अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे पालिकेत शुकशुकाट दिसून आला. विविध कामांनिमित्त आलेल्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागले.