शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा हिवताप कार्यालय स्थलांतर रखडले

By admin | Updated: September 23, 2014 23:50 IST

जालना : जिल्हा हिवताप कार्यालयाची इमारतही पाडण्यात येणार असल्याने या कार्यालयाचे तात्पुरत्या स्वरूपात जुन्या तहसील कार्यालयात स्थलांतर करण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

जालना : गांधीचमन येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या जिल्हा हिवताप कार्यालयाची इमारतही पाडण्यात येणार असल्याने या कार्यालयाचे तात्पुरत्या स्वरूपात जुन्या तहसील कार्यालयात स्थलांतर करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे या स्थलांतराचे आदेश जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी दिले आहेत.गांधीचमन येथील जिल्हा स्त्री रूग्णालयाच्या नवीन इमारतीचा शुभारंभ गेल्या काही दिवसापूर्वी झाला. जीर्ण झालेली ही इमारत पाडण्याच्या कामास वेग आला असून या भागात स्थित असलेल्या जिल्हा हिवताप कार्यालयास जिल्हा स्त्री रूग्णालयाच्या वतीने कार्यालय इतरत्र हलविण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र सध्या जिल्हा हिवताप कार्यालय हे जुने तहसील कार्यालय येथे हलविण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट आदेश दिलेले असताना काही अपहार्य कारणास्तव जिल्हा हिवताप कार्यालय स्थलांतर होण्यास अडचण निर्माण होत आहे.जुने तहसील कार्यालयाची डागडुजी तसेच काही जुने साहित्य तेथे स्थित असल्यामुळे तहसीलदार यांच्याकडून अद्याप जुन्या इमारतीचा ताबा देण्यात आलेला नाही. जुने तहसील कार्यालय दुरूस्तीकरीता काही काळ लागणार असल्याचे समजते. ेत्यामुळे हिवताप कार्यालय तेथे सध्या स्थलांतर होऊ शकत नाही. तर दुसरीकडे स्त्री रूग्णालय प्रशासनाच्या वतीने जिल्हा हिवताप कार्यालय स्थलांतरण करण्याबाबत वारंवार पाठपुरावा होत आहे. जिल्हा हिवताप अधिकारी तोनगिरे यांना विचारले असता, जुनी तहसील इमारत येथे जाण्यास काही हरकत नाही, परंतू त्या इमारतीच्या खिडक्या आणि काही दुरूस्तीचे कामाअभावी तेथे असुरक्षित असल्यामुळे सध्या स्थलांतर करणे शक्य नाही. शिवाय तहसीलदार यांच्यामार्फत सध्या ताबा देण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले.तहसीलदार रेवननाथ लबडे म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश दिलेले आहेत. परंतु जुन्या तहसील कार्यालयात काही दुरूस्तीचे काम सुरू आहे. हे काम झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा हिवताप कार्यालयाचे स्थलांतर होणार आहे. (प्रतिनिधी)