शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी टँकरच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाच्या हालचाली

By admin | Updated: February 9, 2016 00:27 IST

लातूर : खाजगी टँकरद्वारे पाणी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे मनमानी भाव आकारून नागरिकांची लूट होत आहे.

लातूर : खाजगी टँकरद्वारे पाणी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे मनमानी भाव आकारून नागरिकांची लूट होत आहे. ‘लोकमत’ने या संदर्भात प्रकाश टाकल्यानंतर आता प्रशासन सरसावले आहे. मनपा आयुक्तांनी पाणी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांची बैठक बुधवारी बोलाविली असून, या बैठकीत त्यांचे म्हणणे जाणून घेतल्यानंतर दर आकारणी ठरविली जाणार आहे.लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई असल्याने अनेकांनी पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. छोट्या व मोठ्या टँकरद्वारे घरपोच पाणी देण्याचा हा व्यवसाय तेजीत आला आहे. ५०० लिटर्सपासून १२ हजार लिटर्स क्षमतेच्या टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचा व्यवसाय शहरात जोरात चालू असून, विक्रेते मनमानी आकारणी करून नागरिकांना वेठीस धरीत आहेत. ‘लोकमत’ने या संदर्भात पाणी विक्रेत्यांवर नियंत्रण कोणाचे? या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्यानंतर मनपा आयुक्तांनी विक्रेत्यांची बैठक बोलाविली आहे. बुधवारी मनपा आयुक्तांच्या दालनात ही बैठक होणार असून, सर्व विक्रेत्यांचे म्हणणे जाणून घेतल्यानंतर दराबाबत चर्चा केली जाणार आहे. वाहतुकीचा खर्च, वीजबिल व अंतर लक्षात घेऊन दर ठरविण्याबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. दरम्यान, विक्रेत्यांचा एक संघ स्थापन करण्याचाही विचार असून, या संघाला दराबाबत सक्त निर्देश देण्याच्या हालचाली प्रशासनाकडून आहेत.शहरात मनपाकडून व ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या टंचाई निवारण कक्षाकडून टँकर सुरू आहेत. या टँकरसाठी जो खर्च शासन करते, त्या धर्तीवर खाजगी वितरक व व्यावसायिकांना पाण्याचे वितरण करणे शक्य आहे का, या सर्व बाबींचा विचार बैठकीत केला जाणार आहे. त्यादृष्टीने पाणी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांची यादी मनपाच्या अधिकाऱ्यांनी तयार केली असून, त्यांना बैठकीला उपस्थित राहण्याबाबत निर्देशही देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)