शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

औरंगाबाद शहरभर पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:23 AM

महापालिका जायकवाडी धरणातून रोज १५९ एमएलडी पाणी उपसते. पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या महिनाभरात अंदाजे ४.६९ क्युबिक मीटर पाणी पालिकेने आजवर धरणातून उपसले आहे. १५५ ते १५९ एमएलडीच्या आसपास तो आकडा जातो.

ठळक मुद्देमनपा रोज उपसते १५९ एमएलडी पाणी : एवढे पाणी जायकवाडीतून घेऊनही ठणठणाट

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिका जायकवाडी धरणातून रोज १५९ एमएलडी पाणी उपसते. पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या महिनाभरात अंदाजे ४.६९ क्युबिक मीटर पाणी पालिकेने आजवर धरणातून उपसले आहे. १५५ ते १५९ एमएलडीच्या आसपास तो आकडा जातो. पैठण ते नक्षत्रवाडीपर्यंत २० टक्के पाणी गळती होते. १३९ एमएलडी पाणी पालिका शहरात रोज कुठे-कु ठे वितरित करते, असा प्रश्न आहे. सध्या तीन दिवसाआड पाणीपुरवठा होतो आहे. मग तीन दिवसांतील ४२० एमएलडी पाणी पालिका कुणाला पुरविते याची कुठलीही माहिती पाणीपुरवठा विभागाकडे नाही.दरम्यान, जुन्या शहरासह सिडको, हडको, पडेगाव, सातारा देवळाई परिसर, जटवाडा रोड, अशा सर्वच ठिकाणी नागरिकांची पाण्यासाठी वणवण दिसते.पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या चार दिशांमध्ये शहरी लोकसंख्येची विभागणी केली, तर ४ लाख लोकसंख्या प्रत्येक दिशेमध्येचे प्र्रमाण येते. मग ४ लाख लोकांना रोज १४ कोटी लिटर पालिका पुरवीत असेल, तर दरडोई ३५० लिटर पाणी मिळण्याचे प्रमाण येते; परंतु एकाही दिशेत राहणाऱ्या नागरिकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी मिळत नाही. चारही दिशांमधून पाण्यासाठी ओरड सुरू आहे. कारण शहरात गळतीवर मात करून येणाºया १३९ एमएलडी पाणी जर प्रत्येक मतदारसंघनिहाय तीन दिवसाआड दिले, तर पाण्याची ओरडच होणार नाही; परंतु कुठेही ३५० लिटर दरडोई पाणी शहरात मिळत नाही. १३५ लिटर, २७० लिटर आणि ३५० लिटर, असे तीन प्रकार दरडोई पाणीपुरवठा करण्यासाठी आहेत. यातील एकही मानक पालिका सध्या पूर्ण करू शकत नाही.अनेक भागांत अर्धा तास पाणीपुंडलिकनगर जलकुंभावरील वसाहतींना गुरुवारी अर्धा तास पाणीपुरवठा करण्यात आला. भावसिंगपुरा परिसरात पाणीपुरवठाच झाला नाही. एकाच दिवशी दोन टोकांच्या वसाहतींना पाणीपुरवठा करण्याचे हे कसले नियोजन आहे. हे विचारण्यासाठी कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांना संपर्क केला असता त्यांचा फोन बंद होता. पालिका रोजी १३९ एमएलडी पाणी शहरात आणत आहे. मग ते शहरातील कोणत्या भागात वितरित केले जाते, त्याचे वेळापत्रक कसे आहे, प्रभागनिहाय पाणीपुरवठा सुरू आहे काय? याची कोणतीही माहिती पालिकेकडे उपलब्ध नाही. रोज एवढे पाणी येत असेल, तर जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरून वितरण होणे शक्य आहे. काही वॉर्डांना २४ तास पाणी सुरू असते, तर काही वॉर्डांत पाच दिवस उलटूनही पाणी येत नाही, अशी परिस्थिती आहे.सातारा देवळाईत हातपंप, विहिरीने तळ गाठलासातारा-देवळाईत दरवर्षी उन्हाळा सुरू होताच पाणीपातळी घटते. परिसरातील पाणीपुरवठ्याच्या विहिरीने तळ गाठला असून, हातपंप, बोअरवेलला थेंबभरही पाणी येत नाही. त्यामुळे महिला व लहान मुलांना भर उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरवर्षी ग्रामपंचायत काळात जिल्हा प्रशासन मोफत टँकरने पाणीपुरवठा करीत होते.मनपात परिसर समाविष्ट झाला आणि पाण्यासाठी नागरिकांना आता बारा महिने पैसे मोजावे लागत आहेत. हातपंपावर नागरिकांची जेमतेम तहान भागत होती; परंतु उन्हाचा पारा वाढला. भूगर्भातील पाणी आटले असून, विहीर व बोअरवेलने तळ गाठला आहे. पाण्यासाठी नागरिकांना परिसरात भटकंती केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.पाणीपुरवठा करणाºया विहिरीने तळ गाठल्याने दोन महिन्यांपासून विहिरीचे जलवाहिनीद्वारे येणारे पाणी खंडित झाले आहे. पाणी मिळावे म्हणून स्थानिक नागरिकांनी तीव्र निदर्शनेदेखील केली. कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था सध्या कोसोदूर दिसतेय. शाळेतील मुलेदेखील उन्हाळ्यात पायपीट करीत पाण्याचा शोध घेताना दिसत आहेत.घाटीत पाणीटंचाई; रुग्णसेवेवर परिणामगेल्या काही दिवसांपासून घाटी रुग्णालयाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. महापालिकेकडून अपुरा आणि वेळी अवेळी पाणीपुरवठा होत असल्याने पाण्याचा तुटवडा निर्माण होत आहे. परिणामी अनेक विभागांसाठी टँकर मागविण्याची नामुष्की ओढावत आहे.घाटीत एकट्या बाह्यरुग्ण विभागात दररोज २००० ते २५०० रुग्ण येतात. दररोज छोट्या-मोठ्या ५० ते ७० शस्त्रक्रिया होतात. अपघात विभागात २०० ते ३०० रुग्ण दाखल होतात, तर दररोज ६० ते ७० प्रसूती होतात. स्वच्छतेसह रुग्णसेवेसाठी सर्वच वॉर्ड, अतिदक्षता कक्ष तसेच शस्त्रक्रियागृहात मोठ्या प्रमाणावर पाणी लागते. (पान २ वर)

टॅग्स :water shortageपाणीकपातAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाई