शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

परिवहन अधिकारी नखाते यांच्याकडून चाचणीविना ४ हजार परवान्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 7:13 PM

एक नव्हे, दोन नव्हे तब्बल ४ हजार परवान्यांचा हा घोटाळा आहे.

ठळक मुद्दे‘एआरटीओं’चे आणखी एक प्रकरण सुटीच्या दिवशी परवाने मंजूर परिवहन आयुक्त कार्यालयाला अहवाल, चौकशी सुरू

औरंगाबाद : चोरीच्या ट्रकच्या पुनर्नोंदणीप्रकरणी गुन्हा दाखल झालेले सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांची इतर प्रकरणेही आता समोर येऊ लागली आहेत. तब्बल ४ हजार पक्के वाहन चालविण्याचे परवाने चाचणीविना, सुटीच्या दिवशी वाटप केल्याप्रकरणीही चौकशी सुरू असल्याची माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली.

एक नव्हे, दोन नव्हे तब्बल ४ हजार परवान्यांचा हा घोटाळा आहे. नागपूर आरटीओ कार्यालयात एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत लर्निंग लायसन्सचा घोटाळा झाल्याचे समोर आले होते. याप्रकरणी अधिकारी-एजंटासह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यात सहायक मोटार वाहन निरीक्षकांना अटकही झाली होती. औरंगाबादेतील परवाना घोटाळाही अशाच पद्धतीचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातील अनेक परवाने चाचणीविना वाटप झालेले आहेत, तर अनेक परवाने कार्यालय बंद असल्याच्या दिवशी म्हणजे सुटीच्या दिवशी मंजूर झालेले आहेत. या सगळ्याला जबाबदार असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू असल्याचे आरटीओ कार्यालयाकडून सांगण्यात आले. यामध्ये श्रीकृष्ण नकाते यांचे प्रमुख नाव आहे. विनाचाचणी आणि सुटीच्या दिवशी पक्के लायसन्स देण्याच्या प्रकाराविषयी प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांच्याशी संपर्क साधला असता, या प्रकारणाची चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

१०० पानी अहवालआरटीओ कार्यालयाने यासंदर्भात १०० पेक्षा अधिक पानांचा अहवाल तयार केला आहे. यामध्ये वितरित झालेल्या परवान्यांची माहिती नमूद केलेली आहे. औद्योगिक कंपन्यांत मालाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लोडरचे (वाहन) लायसन्स दिले गेले आहे. प्रत्यक्षात चाचणीसाठी असे वाहन आलेले नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.  परिवहन आयुक्त कार्यालयाला सविस्तर अहवाल पाठविण्यात आला आहे. 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबादCorruptionभ्रष्टाचार