शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
10
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
11
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
12
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
13
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
14
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
15
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
16
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

चोरीच्या पैशावरुन झाला वाद; नशा देऊन तरुणाचा गळा चिरून खून केल्यानंतर मृतदेह जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 1:48 PM

जालना रोडवरील कुंभेफळ पाटीपासून १२० फूट अंतरावर मंगळवारी सकाळी तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास चक्र गतीने फिरवत दुपारपर्यंत मृतदेहाची ओळख पटवली.दोघांना ताब्यात घेऊन चाैकशी केली असता त्यांनी शेख आमिरचा खून केल्याचे कबूल केले.

करमाड : कुंभेफळ पाटीजवळ सकाळी अर्धवट जळालेल्या अवस्थेत शेख आमिर शेख नजीर (२०, रा. नारेगाव) याचा मृतदेह आढळून आला होता. चोरीच्या पैशाच्या वादातून २० वर्षीय तरुणाचा खून करण्यात आल्याचे मंगळवारी सायंकाळी पोलीस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मुख्य आरोपी शेख कामील ऊर्फ गुडु शेख जमील (२३) व शेख चांद शेख गणी (दोघे रा. नारेगाव) यांना अटक केली आहे, तर इतर दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.

जालना रोडवरील कुंभेफळ पाटीपासून १२० फूट अंतरावर मंगळवारी सकाळी तरुणाचा मृतदेह आढळून आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास चक्र गतीने फिरवत दुपारपर्यंत मृतदेहाची ओळख पटवली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. यात शेख कामील ऊर्फ गुडु शेख जमील (२३) व शेख चांद शेख गणी (दोघे रा. नारेगाव) या दोघांची नावे पुढे आली. दोघांना ताब्यात घेऊन चाैकशी केली असता त्यांनी शेख आमिरचा खून केल्याचे कबूल केले.

काही दिवसांपासून या तिघांमध्ये चोरीच्या पैशावरून वाद होता. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात कडाक्याचे भांडणही झाले होते. याचा राग मनात धरून आमिरचा काटा काढण्याचा कट आरोपींनी रचला. आरोपींनी नारेगाव येथे सोमवारी रात्री आमिरला दारू व गांज्याच्या नशेत धुंद केले. त्यानंतर रिक्षाने त्याला कुंभेफळ पाटीवर निर्मनुष्य ठिकाणी आणण्यात आले. मध्यरात्रीनंतर ३ वाजेच्या सुमारास आरोपींनी आमिरचा धारदार शस्त्राने गळा चिरला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पुन्हा त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळले. यातील २ आरोपींना अटक केली असून, इतर दोघांचा शोध सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, पो.नि. संतोष खेतमाळस, पोलीस उपनिरीक्षक संदीप सोळुंके, प्रशांत पाटील, राजू नागलोत, गणेश राऊत, श्रीमंत भालेराव, संदीप जाधव, धीरज जाधव, विक्रम देशमुख ज्ञानेश्वर मेटे, संजय तांदळे, योगेश तरमळे आदींनी केली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबाद