शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका आयुक्तांना खंडपीठाची अवमान नोटीस

By admin | Updated: July 22, 2014 00:50 IST

औरंगाबाद : सलीम अली सरोवरातील जैव विविधतेला नुकसान होईल, असे कोणतेही काम तेथे करू नये, असे अंतरिम आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिलेले असताना महानगरपालिकेने २ जुलै रोजी या सरोवराचे उद््घाटन केले.

औरंगाबाद : सलीम अली सरोवरातील जैव विविधतेला नुकसान होईल, असे कोणतेही काम तेथे करू नये, असे अंतरिम आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिलेले असताना महानगरपालिकेने २ जुलै रोजी या सरोवराचे उद््घाटन केले. उद््घाटनापूर्वी मनपाने खंडपीठाची अथवा अन्य जैव विविधता समितीची मान्यता घेतली नसल्याचे याचिकाकर्त्यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले, असता न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. व्ही. एल. आंचलिया यांनी मनपा आयुक्तांना अवमान नोटीस बजावण्याचे आदेश दिले.येथील सलीम अली सरोवराला जैवविविधता वारसास्थळ म्हणून जाहीर करावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका सलीम अली सरोवर संवर्धन समितीने अ‍ॅड. महेश भारस्वाडकर यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात गेल्या वर्षी दाखल केली होती. २ जानेवारी २०१४ रोजी खंडपीठाने जैवविविधता कमिटी नेमली. दोन महिन्यांत राज्य शासनास अहवाल सादर करावा, असे आदेश कमिटीला दिले होते. तसेच तत्पूर्वी १७ आॅक्टोबर २०१३ रोजी सरोवरातील जैवविविधतेला बाधा येईल, असे कोणतेही काम तेथे करू नये, असे अंतरिम आदेश दिले होते. ते आदेश आजही कायम आहेत. दरम्यान, सुशोभीकरण करण्यात आलेल्या सलीम अली सरोवराचे उद्घाटन २ जुलै रोजी मनपाने केले. याविषयी मनपा आयुक्तांनी न्यायालयात शपथपत्र दाखल करून उद्घाटन करण्यापूर्वी जैवविविधता समितीची परवानगी घेतल्याचे नमूद केले होते. आज ही याचिका पुन्हा सुनावणीसाठी आली असता याचिकाकर्त्यांनी जैवविविधता कमिटीच्या ४ मार्च २०१४ रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्तच न्यायालसमोर सादर केले. या इतिवृत्तात सरोवर जनतेसाठी खुले करावे, अशी सूचना एका सदस्याने मांडली होती. त्याबाबत कोणताही निर्णय समितीने घेतला नसल्याचे दिसले. तसेच सरोवर पाहण्यासाठी येणाऱ्यांना प्रवेश शुल्क लावून जैवविविधतेला बाधा येईल अथवा नाही, याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन मनपाने घेतले नाही. खंडपीठाच्या १७ आॅक्टोबर २०१३ रोजीच्या अंतरिम आदेशाचाही अवमान मनपाने केला असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.