अल्पवयीन मुलीचा विनयभंग; जाब विचारणाऱ्या कुटुंबास जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 17:10 IST2020-01-30T16:58:15+5:302020-01-30T17:10:00+5:30

बस स्थानकापासून घरी परतत असताना केला विनयभंग

Disgrace of a minor girl in Ambajogai | अल्पवयीन मुलीचा विनयभंग; जाब विचारणाऱ्या कुटुंबास जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; जाब विचारणाऱ्या कुटुंबास जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथील 17 वर्षीय युवती गावातील बस स्थानकाहून घराकडे जाताना गावातील युवकाने तिचा विनयभंग केला. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलीच्या कुटुंबियास आरोपीने जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. हा प्रकार राडी येथे मंगळवारी दुपारी घडला.

अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथील सतरा वर्षीय युवती अंबाजोगाईत महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. ती दररोज बसणे येणे-जाणे करते. मंगळवारी दुपारी दोन वाजता  सदरील युवती अंबाजोगाई येथून राडी येथे आली. गावातील बस स्थानकातून घराकडे जाताना तिला जिल्हा परिषद शाळे जवळ तिचा पाठलाग करणारा गावातील युवक ज्ञानेश्वर रमेश गंगणे गंगणे याने त्या युवतीला पत्र दिले. तिने पत्र घेण्यास नकार दिला असता त्याने तिचा विनयभंग केला. त्या युवतीने हा प्रकार त्याच्या कुटुंबीयांना सांगितला. 

या घटनेचा जाब विचारण्यासाठी तिचे कुटुंबीय ज्ञानेश्वर यांच्या घरी गेले असता पीडितेचे भाऊ व आजी यांना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली या प्रकरणी पीडित युवतिच्या फिर्यादीवरून आरोपी ज्ञानेश्वर रमेश गंगणे याच्याविरुद्ध विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व  अँट्रासिटी कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान आरोपीस अटक करण्यात आली असून  या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक राहुल धस करीत आहेत.

Web Title: Disgrace of a minor girl in Ambajogai