अंनिसच्या बैठकीत चर्चा

By Admin | Updated: August 4, 2014 00:52 IST2014-08-03T23:49:08+5:302014-08-04T00:52:23+5:30

हिंगोली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेला ९ आॅगस्ट रोजी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. तर २० आॅगस्ट रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे.

Discussion at Anna's meeting | अंनिसच्या बैठकीत चर्चा

अंनिसच्या बैठकीत चर्चा

हिंगोली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेला ९ आॅगस्ट रोजी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. तर २० आॅगस्ट रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. दोन्ही दिवशी संघटनेकडून विविध आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याचा निर्णय हिंगोलीत रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
अंनिसचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे (लातूर) यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य सरचिटणीस प्रा. डॉ. शिवदास हमंद यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक झाली.
बैठकीत कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कौटुंबिक संकल्प मेळावे आणि संघटनेच्या वाटचाली संदर्भात कार्यक्रम घेण्याचे ठरले. तर २० आॅगस्ट रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतीदिन आंदोलनात्मकरित्या साजरा पाळण्याचे ठरले. दाभोलकरांच्या खुनाचा तपास अजून लागलेला नाही. त्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी प्रथम स्मृतिदिनी मानवी साखळीचे आयोजन करून समविचारी लोकांना सोबत घेऊन निवेदन देण्याचे ठरले.
बैठकीस जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रकाश इंगोले, गजानन कुटे, एकनाथ कऱ्हाळे, त्र्यंबक पोघे, संजय डोंगरे, युसूफ मामू, अ‍ॅड. सीताराम राठोड, भागोराव राठोड, आयुब खॉ पठाण, भास्कर लांडगे, सुरेश गवळी आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Discussion at Anna's meeting