शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत विविध ठरावांवर चर्चा

By admin | Updated: May 29, 2015 01:04 IST

औरंगाबाद : कालपासून सुरू झालेल्या अभाविपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत विविध ठराव चर्चेला घेण्यात आले आहेत. त्यावर विस्तृत चर्चा करून ते संमत करण्यात येतील.

औरंगाबाद : कालपासून सुरू झालेल्या अभाविपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत विविध ठराव चर्चेला घेण्यात आले आहेत. त्यावर विस्तृत चर्चा करून ते संमत करण्यात येतील. केंद्राच्या नवीन शैक्षणिक धोरणात कोणत्या मुद्यांचा समावेश करण्यात यावा, यासाठी देशभरातील व्यापक विचारविनिमयानंतर अभाविपने एक मसुदा तयार केला आहे. प्रा. मिलिंद मराठे यांनी हा मसुदा बैठकीसमोर ठेवला. शैक्षणिक गुणवत्तेसाठी चांगली प्रशासनिक यंत्रणा असावी, संस्थांच्या श्रेणी व मानांकन प्रक्रियेत सुधारणा, नियमन व्यवस्थेच्या गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना, केंद्रीय संस्था तसेच राज्याच्या अखत्यारीतील शिक्षण संस्थांना सक्षम बनविणे, उच्च शिक्षणातील कौशल्य विकासावर भर, बहिस्थ शिक्षण, सामाजिक व लिंगभेद मिटविण्यासाठी उपाययोजना, गुणवत्तापूर्ण शिक्षक निर्मितीवर भर, भारतीय भाषांमधून उच्च शिक्षण देण्यास प्रारंभ, ज्याद्वारे सांस्कृतिक एकात्मतेस बळ मिळेल, उच्च शिक्षणासाठी भरघोस निधी प्रदान करण्याची आवश्यकता, संशोधनावर मोठ्या प्रमाणात भर देण्याची गरज, या व अन्य मुद्यांवर या बैठकीत विषयवार चर्चा झाली.संघटनात्मक कार्याचा आढावा राष्ट्रीय संघटनमंत्री सुनील अंबेकर यांनी मागील दहा वर्षांचे संघटनात्मक वृत्त बैठकीसमोर ठेवले. त्यानुसार अनेक प्रांतांमध्ये एक लाखांपेक्षा जास्त सदस्यता करण्यात आली आहे. अनेकांच्या भेटीपाटीदार भवन येथे सुरू असलेल्या अभाविपच्या या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीस शहरातील अनेकांनी भेटी दिल्या. राज्याच्या महिला व बालकल्याण तसेच ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे- पालवे, नेहरू विकास केंद्राचे उपाध्यक्ष विष्णू शर्मा, भारतीय किसान संघाचे पश्चिम संघटनमंत्री श्रीरंग लाड, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, आ. अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड, भाजपचे किशनचंद तनवाणी, बापू घडामोडे, अधिवक्ता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायक पाटील आदींनी कार्यकारिणी बैठकीस भेट देऊन उपस्थित प्रतिनिधींशी चर्चा केली.