बीड: देशभरात सध्या पिके या चित्रपटाला काही संघटनांकडून विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालकांनी अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्याकडून माहिती मागवली़१ जानेवारी २०१५ रोजी पोलीस महासंचालकांचे पत्र अधीक्षक कार्यालयास प्राप्त झाले आहे. पीके चित्रपटावरुन कोणत्याही ठिकाणी गोंधळ अथवा संघटनांनी विरोध केला नसल्याचे अधीक्षकांनी माहितीत म्हटले आहे. शहरातील दोन टॉकीजसह इतर तालुक्यांच्या ठिकाणी हा चित्रपट सुरु आहे. सदरील चित्रपटामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या अनुषंगाने ही माहिती मागविण्यात आली असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}