लेकीच्या लग्नाचे सोने घेतले का ? ऐन लग्नसराईत भाव ७० हजारांवर जाणार !
By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 28, 2024 17:52 IST2024-03-28T17:51:03+5:302024-03-28T17:52:37+5:30
तुमच्या लाडक्या लेकीचे लग्न ठरले असेल तर आताच सोने खरेदी करून ठेवा. नसता नंतर लग्नाचे बजेट कोलमडेल.

लेकीच्या लग्नाचे सोने घेतले का ? ऐन लग्नसराईत भाव ७० हजारांवर जाणार !
छत्रपती संभाजीनगर : लग्नात नवरीला सोन्याचे दागिने व नवरदेवाला अंगठी घ्यावीच लागते. आजघडीला १० ग्रॅम सोने ६६८०० रुपयांना विकत घ्यावे लागत आहे. येत्या महिना-दीड महिन्यात हेच सोने ७० हजारांपर्यंत जाऊन पोहोचेल, अशी शक्यता सराफा व्यापारी व्यक्त करीत आहेत. तुमच्या लाडक्या लेकीचे लग्न ठरले असेल तर आताच सोने खरेदी करून ठेवा. नसता नंतर लग्नाचे बजेट कोलमडेल.
जानेवारी महिन्यात सोन्याचा भाव ६४२०० रुपये प्रति १० ग्रॅम विकत होते. सध्या ६६८०० रुपयांना विकत आहे. जानेवारीपासून आतापर्यंत सोन्याचा भाव ४६०० यांनी वाढला आहे.
वर्षभरात किती हजारांनी वाढला सोन्याचा भाव
महिना किंमत (१० ग्रॅम)
२०२३
१) मार्च --- ५९१०० रुपये
२) एप्रिल --- ६०५०० रुपये
३) मे --- ६०९०० रुपये
४) जून--- ५९०५५ रुपये
५) जुलै----६०५०० रुपये
६) ऑगस्ट--- ६०४०० रुपये
७) सप्टेंबर-- ५८५०० रुपये
३) का वाढला सोन्याचा भाव? (बॉक्स)
८) ऑक्टोबर ----६१८०० रुपये
९) नोव्हेंबर---- ६३५०० रुपये
१०) डिसेंबर ६४२०० रुपये
२०२४
११) जानेवारी (२०२४)---६४२०० रुपये
१२) फेब्रुवारी--- ६३५०० रुपये
१३) १५ मार्च---६७५०० रुपये
महिना ते दीड महिन्यात सोन्याचा भाव ७० हजारांवर
आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरचे भाव कमी होत आहेत. सर्व देशांनी सोने खरेदीचा सपाटा लावला आहे. चीनपासून ते रशियापर्यंत सर्व देश त्यांच्याकडील सोन्याचा साठा वाढवीत आहेत. त्यात भारतात सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. यामुळे सोन्याचा भाव वाढत आहे. अशी परिस्थिती राहिली तर येत्या महिना ते दीड महिन्यात सोन्याचा भाव ७० हजारांवर जाऊन पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको.
- गिरधर जालनावाला, ज्वेलर्स
मागील वर्षभरात सोने ७७०० रुपयांनी वधारले
मागील वर्षभरात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅममागे ७७०० रुपयांनी वाढला आहे. यामुळे सोन्यातील गुंतवणूकही फायदेशीर मानली जात आहे. प्रत्यक्ष सोने खरेदी करून तिजोरीत ठेवण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.