धनगर समाज उतरला रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:33 IST2018-08-14T01:33:09+5:302018-08-14T01:33:25+5:30
अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळालेच पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी आज धनगर समाज रस्त्यावर उतरला. पैठण रोडवरील कांचनवाडी, नक्षत्रवाडी येथे, पडेगाव, चिकलठाणा व हर्सूल येथे निदर्शने व रास्ता रोको करून धनगर समाज बंधू- भगिनींनी मागणी पूर्ण होत नसल्याचा सरकारबद्दलचा रोष व्यक्त केला.

धनगर समाज उतरला रस्त्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळालेच पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी आज धनगर समाज रस्त्यावर उतरला. पैठण रोडवरील कांचनवाडी, नक्षत्रवाडी येथे, पडेगाव, चिकलठाणा व हर्सूल येथे निदर्शने व रास्ता रोको करून धनगर समाज बंधू- भगिनींनी मागणी पूर्ण होत नसल्याचा सरकारबद्दलचा रोष व्यक्त केला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ही निदर्शने करण्यात आली. यावेळी जगन्नाथ रिठे, लक्ष्मण काळे, मंजित कोळेकर, कैलास रिठे, शिवाजी वैद्य, डॉ. संदीप घुगरे यांची यावेळी भाषणे झाली. संजय कोरडे यांनी सूत्रसंचालन केले. गणेश बनसोडे यांनी आभार मानले. रामेश्वर कोरडे, अमोल परभाळे, विष्णू रिठे, कृष्णा बनसोडे, विनोद रिठे, राजू कोरडे, सुनील रिठे, निवृत्ती रिठे, आकाश रिठे, अजय रिठे, अजय ढोरमारे, अशोक काकडे आदींनी या निदर्शनात सहभाग घेतला.
पैठण रोडवरील कांचनवाडी- नक्षत्रवाडी येथे जनार्दन कांबळे व अॅड. संदीपान नरवटे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अरुण रोडगे यांच्या नेतृत्वाखाली तर पडेगाव येथे नगरसेवक रावसाहेब आम्ले, रमेश निचित, आदिनाथ पल्हाळ यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. हर्सूल येथे रंगनाथ राठोड, पूनम बमणे, सीताराम सुरे व दादाराव सावळे आदींच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. आरक्षण आमच्या हक्काचं.... नाही कुणाच्या बापाचं, धनगर आणि धनगड आहे एकच, अशा घोषणा निदर्शकांनी दिल्या.