शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
2
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
3
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
4
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
5
अमेरिका-चीन ट्रेडवॉरचा फायदा; जागतिक स्मार्टफोन-लॅपटॉप कंपन्या भारतात येण्यास तयार
6
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
8
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
9
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
10
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
11
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
12
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
13
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
14
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
15
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
16
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
17
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
18
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
19
१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?
20
डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले

धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 12:01 IST

सदर जमिनीचा व्यवहार धनंजय आणि पंकजा मुंडे यांच्या संगनमताने गोविंद बालाजी मुंढे या नोकराच्या माध्यमातून झाल्याचाही आरोप त्यांनी केला.

छत्रपती संभाजीनगर : पती प्रवीण महाजन यांच्या नावे असलेली बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामधील मौजे जिरेवाडी येथील गट नंबर २४० मधील करोडो रुपये किमतीची ३६.५० आर जमीन धनंजय मुंडे यांच्या संगनमताने धाकदपटशा दाखवून, कारस्थान रचून, जबरदस्तीने अल्प किमतीला घरगड्याच्या माध्यमातून खरेदी करून घेतली. अशाप्रकारे त्यांची व त्यांच्या कुटुंबाची फसवणूक केल्याचा आरोप प्रवीण महाजन यांची पत्नी सारंगी महाजन यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्र परिषदेत केला.

सदर जमिनीचा व्यवहार धनंजय आणि पंकजा मुंडे यांच्या संगनमताने गोविंद बालाजी मुंढे या नोकराच्या माध्यमातून झाल्याचाही आरोप त्यांनी केला. गोविंद माधव मुंढे, तानाजी दशरथ चाटे आणि गोविंद बालाजी मुंढे यांची सून पल्लवी दिलीप गिते यांच्या नावे जमिनीचा व्यवहार करून फसवणूक केल्याचे त्यांनी सांगितले. महाजन परिवारातील कोणत्याही वारसाला जागेवर येऊ न देता त्यांच्या पश्चात परस्पर व्यवहार ठरवून बोलावून घेतले व बोगस रजिस्ट्री करवून घेतली. सदर व्यवहाराबद्दल कोणाला सांगितल्यास माझ्या परिवाराला संपवून टाकण्याची धमकी दिली होती.

सदर जमिनीबाबत धनंजय आणि पंकजा मुंडे यांना वेळोवेळी विचारणा केली असता त्यांनी उत्तर देण्यास सतत टाळाटाळ केली. सदर जमीन पंडित अण्णा मुंडे यांच्या समाधीसमोर व परळी-बीड हायवेलगत आहे. यातील २७ आर जमीन शासनाने रस्ते विकास कामासाठी संपादित केली आहे. उर्वरित ३६.५० आर जमिनीचा वरील व्यवहार असल्याचे त्यांचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्या उपस्थितीत त्यांनी सांगितले. यासंदर्भात १८ ऑक्टोबर २०२४ रोजी परळी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली.

मात्र, पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. तसेच अंबाजोगाईच्या दिवाणी न्यायालयात विशेष दावा क्रमांक ६१/२४ त्याच दिवशी दाखल केला. न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस बजावण्याचा आदेश दिला असून, २५ नोव्हेंबर रोजी दाव्याची सुनावणी आहे. त्याचप्रमाणे आपण बीडचे पोलिस अधीक्षक आणि पोलिस महासंचालक यांना भेटून तक्रार दाखल करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

.... मुदत संपत असल्यामुळे कारवाईदोन वर्षांपूर्वीच्या व्यवहाराबद्दल ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच कारवाई करण्याचे कारण काय, असा प्रश्न माध्यमाच्या प्रतिनिधींनी विचारला असता आपला राजकारणाशी संबंध नाही. माझी दिवाणी दावा दाखल करण्याची ३ वर्षाची मुदत संपत असल्यामुळे आता कारवाई करीत असल्याचे सारंगी म्हणाल्या.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Dhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीडsarangi mahajanसारंगी महाजन