शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सावरगावात भरला भक्तीचा मळा

By admin | Updated: August 8, 2016 00:40 IST

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील नागोबा यात्रेचा रविवारी अखेरचा दिवस. गण भाकणूक, पालखी मिरवणूक आदी विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साही वातावरणात

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील नागोबा यात्रेचा रविवारी अखेरचा दिवस. गण भाकणूक, पालखी मिरवणूक आदी विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साही वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत या यात्रेची सांगता झाली. लिंबाऱ्याच्या माळा गळ्यात घालून ‘नागनाथ महाराज की जय’ असा जयघोष करीत भाविकांनी या मिरवणुकीत सहभाग नोंदविला होता. आषाढ अमावस्येपासून सावरगाव येथे नागोबा यात्रेला प्रारंभ झाला. सलग पाच दिवस साप-पाल-विंचू हे प्राणी एकत्रित राहतात हे या यात्रेचे खास वैशिष्ट्य आहे. त्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी होती. रविवारी दुपारी ३ वाजता पुजारी कल्याण स्वामी यांच्या घरापासून गण पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला. मारुती मंदिरात संजय कोळी या मानकऱ्यांच्या हस्ते पुजारी कल्याण स्वामी यांना अंघोळ घालून टाळ-मृदंगाच्या गजरात गण मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी सहा वाजता मिरवणूक मंदिराजवळ आल्यानंतर कल्लोळात पुजारी स्वामी यांना स्नान घालून भाकणूक कार्यक्रमासाठी आणण्यात आले. यावेळी मंदिरालगत ओठ्यावर मानकरी केशव डोके यांनी खरीप रब्बी हंगामातील धान्याचे ढिगारे मांडले होते. कल्याण स्वामी यांनी धान्यास स्पर्श करून गहू, ज्वारी, साली, मिरची, हरभरा या धान्य पिकांचे उत्पादन वाढेल व पर्जन्यमान भरपूर राहणार असल्याचे भाकित केले. पंचारतीने यात्रेची सांगता झाली. मिरवणुकीत भजनी मंडळ, तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांबरोबरच तुळजापूर व सोलापूर जिल्ह्यातून हजारो भाविक दर्शनासाठी आले होते. सावरगाव येथील क्लासमेट ग्रुपच्या वतीने भाविकांना लाडू व थंड पाण्याचे वाटप केले. यात्रास्थळी तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि मिर्झा बेग यांनी ३५ पोलीस कर्मचारी, दोन अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात केले होते. तुळजापूर आगाराच्या वतीने जादा बसेसचीही सोय करण्यात आली होती. बसस्थानक ते नागोबा मंदिरपर्यंतचा परिसर भाविकांचे गर्दीने फुलून गेला होता. यात्रा काळात सावरगाव आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.एल. तेलंग यांनी आरोग्य पथक तैनात ठेवले होते. (वार्ताहर)