'लाडकी बहीण' मुळे विकासकामांना ब्रेक, निधीची ओढाताण मान्य; संजय शिरसाटांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 16:27 IST2026-02-28T16:26:06+5:302026-02-28T16:27:20+5:30

अजित पवार अपघात प्रकरण: 'ब्लॅक बॉक्स' सुरक्षित, DGCA च्या अहवालानंतर सर्व गुपिते उघड होतील - संजय शिरसाट

Development works came to a halt due to 'Ladki Bahaeen Scheme'; Government funds are being diverted: Sanjay Shirsat's confession | 'लाडकी बहीण' मुळे विकासकामांना ब्रेक, निधीची ओढाताण मान्य; संजय शिरसाटांची कबुली

'लाडकी बहीण' मुळे विकासकामांना ब्रेक, निधीची ओढाताण मान्य; संजय शिरसाटांची कबुली

छत्रपती संभाजीनगर: "लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी सरकारने एक पाऊल मागे घेतले असून, यामुळे विकासकामांना काही प्रमाणात ब्रेक लागला आहे," अशी प्रांजळ कबुली शिवसेना प्रवक्ते आ. संजय शिरसाट यांनी शनिवारी येथे दिली. शहरातील विविध राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अजित पवार अपघात: अहवालानंतर सत्य समोर येईल
अजित पवार यांच्या निधनाला एक महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिरसाट म्हणाले की, "या अपघाताबाबत अनेकांनी अनेक अंदाज लावले आहेत. ब्लॅक बॉक्स जळाल्याचे सांगितले जात होते, मात्र तो सुरक्षित आहे. DGCA चा अहवाल आल्यावर घातपात की अपघात, हे स्पष्ट होईल. रोहित पवार यांनी जी माहिती काढली आहे, त्यावर सरकारने लक्ष दिले पाहिजे."

उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
मुंबईच्या महापौर पदाबाबत उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानाचा समाचार घेताना शिरसाट म्हणाले, "उद्धव ठाकरे स्वप्नात आहेत. सरकार बदलणार म्हणता म्हणता पाच वर्षे निघून जातील. मुंबईचा महापौर आमचाच असेल. त्यांनी आता स्वतः कधी मुख्यमंत्री होणार, हेही सांगून टाकावे."

Web Title : लाड़की बहिन योजना से विकास बाधित; संजय शिरसाट ने मानी आर्थिक तंगी।

Web Summary : संजय शिरसाट ने लाड़की बहिन योजना के कारण विकास में मंदी स्वीकार की। उन्होंने अजित पवार की दुर्घटना पर बात की, डीजीसीए रिपोर्ट का इंतजार है। शिरसाट ने उद्धव ठाकरे के महापौर के दावों की आलोचना की, सरकार की निरंतर स्थिरता की भविष्यवाणी की।

Web Title : Ladki Bahin Scheme halts development; Sanjay Shirsat admits funding strain.

Web Summary : Sanjay Shirsat acknowledged development slowdown due to the Ladki Bahin scheme. He addressed Ajit Pawar's accident, awaiting DGCA report. Shirsat criticized Uddhav Thackeray's mayoral claims, predicting continued government stability.