शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विकास आराखड्याचे पाकीट सोमवारी फुटणार

By admin | Updated: December 23, 2015 00:07 IST

औरंगाबाद : शहराचा सुधारित विकास आराखडा सोमवार दि. २८ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.

औरंगाबाद : शहराचा सुधारित विकास आराखडा सोमवार दि. २८ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. महापौर त्र्यंबक तुपे यांनी त्यासाठी विशेष सर्वसाधारण बोलावली असून, त्यात सभेसमोर हा आराखडा ठेवला जाणार आहे. नगररचना खात्याने दीड महिन्यापूर्वी हा आराखडा बंद पाकिटात आयुक्तांकडे सादर केलेला आहे. महानगरपालिकेच्या मूळ विकास आराखड्यात १९९१ मध्ये सुधारणा करण्यात आली होती. त्यानंतर मनपाने २०१२ साली या आराखड्यात सुधारणा करण्याचे काम नगररचना खात्याकडे सोपविले. तब्बल वर्षानंतर नगररचना खात्याने ३० आॅक्टोबर २०१५ रोजी तत्कालीन आयुक्त प्रकाश महाजन यांच्याकडे हा सुधारित आराखडा सादर केला होता. हा आराखडा सर्वसाधारण सभेसमोर ठेवून नागरिकांसाठी प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यावर नागरिकांच्या हरकती आणि सूचना घेऊन तो अंतिम केला जाईल; परंतु गेल्या दीड महिन्यापासून हा आराखडा आयुक्तांकडे बंद पाकिटात पडलेला आहे. आता अखेर महापौर त्र्यंबक तुपे यांनी त्यासाठी सोमवार दि. २८ डिसेंबर रोजी विशेष सभा बोलावली आहे. या सभेत हा आराखडा जाहीर केला जाईल. सुधारित आराखड्यात शहरालगतच्या नो डेव्हलपमेंट झोनमधील बरीचशी जमीन यलो झोनमध्ये येण्याची शक्यताआहे. त्या हरकती आणि सूचनांवर मनपाच्या समितीकडून सुनावणी घेण्यात येईल. त्यानंतर मनपाकडून आवश्यक ते बदल करून तो आराखडा अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. नगररचना खात्याच्या नियमांनुसार महानगरपालिकेकडून सर्वसाधारण सभेनंतर हा सुधारित विकास आराखडा जाहीर केला जाईल. त्यानंतर त्यावर सूचना आणि हरकती मागविण्यात येतील, अशा सूचना आणि हरकती नोंदविण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी असेल.