शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
4
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
5
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
6
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
7
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
8
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
9
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
10
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
11
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
12
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
13
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
14
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
15
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
16
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
17
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
18
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
19
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
20
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
Daily Top 2Weekly Top 5

‘सर्वोपचार’चा विकास थांबला !

By admin | Updated: November 14, 2014 00:54 IST

सितम सोनवणे , लातूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या विकासासाठी परिसरात असलेल्या शासकीय कार्यालयांचा अडथळा होत आहे.

सितम सोनवणे , लातूरशहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या विकासासाठी परिसरात असलेल्या शासकीय कार्यालयांचा अडथळा होत आहे. सर्वोपचारच्या जागेत असलेली शासकीय कार्यालये हटविण्यात येत नसल्याने कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही खर्च करण्याची पंचाईत प्रशासनाची झाली आहे. त्यामुळे सर्वोपचारच्या विकासाला शासकीय कार्यालयाची आडकाठी ठरत आहे़ लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण लातुरातच उपलब्ध करून देण्यासाठी २००२ साली वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले. या महाविद्यालयात २००३ पासून नियमित प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. केंद्र व राज्य शासनानाकडून विविध योजनेअंतर्गत वैद्यकीय महाविद्यालयाच्या विकासासाठी मोठा निधीही मिळाला. जागाही भरपूर आहे. परंतु, सर्वोपचारच्या जागेत असलेली शासकीय कार्यालये इतरत्र हलविण्यात येत नसल्याने विकासाला अडथळा निर्माण झाला आहे. शिवाय, कार्यालय हलविण्यासाठी नेमका पुढाकार घ्यावा कोण, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. सर्वोपचारचा कारभार सध्या प्रभारीवर सुरू आहे. त्यामुळे प्रभारी अधिकारीही सदरील शासकीय कार्यालये हलविण्यात फारसे उत्साही दिसत नाहीत.सर्वोपचारच्या जागेत असलेली शासकीय कार्यालये स्थलांतरीत झाल्याशिवाय इतर कामे होणार नाहीत. त्याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आपल्या गरजेनुसार विद्यार्थ्यासाठी वसतिगृह, ग्रंथालय, तसेच नवनवीन विभाग सुरु करता येणार नसल्याचे सर्वोपचारच्या सूत्रांनी सांगितले. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेअंतर्गत आलेला निधी खर्च करणे अशक्य आहे. या ठिकाणी असलेले कार्यालय हलविण्यासाठी जिल्हा प्रशासनानेच आता पुढाकार घ्यायला हवा. सर्वोपचारला आता सुपर स्पेशालिटी रुग्णालय मंजूर झाले आहे. त्यामुळे लातूर जिल्हा व परिसरातील रुग्णांची मोठी सोय होणार असली, तरी जागाच शासकीय कार्यालयांच्या गराड्यात अडकली आहे.वित्त अभिलेखा कक्ष कार्यालय, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे औषध भाडार, सर्व शिक्षा अभियान चे कार्यालय, समुपदेशन केंद्र व प्रशिक्षण केद्र, स्काउट गईड चे कार्यालय, उपसंचालक कार्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा क्षयरोग कार्यालय, वहान दुरुस्ती विभाग अशी विविध कार्यालये आहेत़ हे कार्यालये शासकीय असल्याने यांना शासनाने पर्यायी जागा देण गरजेचे आहे़ शासकीय सर्वोपचार रुग्णालय व महाविद्यालयास जागा आरक्षित करण्यात आली. त्यानुसारच महाविद्यालयाला मंजुरी मिळाली. सध्या महाविद्यालयाच्या जागेवर शासकीय कार्यालय ठाण मांडून आहे. त्यांना हटविण्यासाठी पुढाकार घेणार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.